37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीयऑनलाईन गुन्हेगारी रोखण्यासाठी सायबर दोस्त

ऑनलाईन गुन्हेगारी रोखण्यासाठी सायबर दोस्त

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात ऑनलाईन चो-या, फसवणुकीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हॅकर्स कोरोनावरील उपचारासाठी लिंक किंवा अन्यप्रकारची आमिषे टाकून लोकांना मोठा आर्थिक गंडा घालत आहेत. अशाप्रकारचे अज्ञानामुळे किंवा लोभाला बळी पडून होणा-या आर्थिक फसवणुकींना आळा घालण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने आता सायबर दोस्त नावाचे ट्विटर हॅँडल आणले असून नागरिकांना ऑनलाईन फसवणुकीबाबत जागृत राहण्याचा इशारा दिला आहे.

कोरोनामुळे लागलेल्या लॉकडाऊनमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहार करण्यास सुरुवात केली होती. नंतर अनलॉकनंतरही तोच प्रकार चालू राहिला. मात्र दुसरीकडे ऑनलाईन चोरट्यांचेही त्यामुळे फावले आहे. ऑनलाईन चो-या, लूट, फसवणुकीच्या घटनांत वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने नागरिकांना दक्षतेच्या सूचना दिल्या आहेत.

इंटरनेटचा वाढता वापर आणि ऑनलाइन व्यवहारांसंदर्भात पुरेशी साक्षरता नसल्याने ऑनलाइन माध्यमातून होणारे आर्थिक फसवणुकीचे गुन्हा वाढत आहेत. सध्यातर कोरोनाच्या लसीकरण किंवा अन्य बाबींच्या माध्यमातून कॉल किंवा एसएमएसवरुन लोकांना फसवले जात आहे. त्यामुळे सायबर दोस्तच्या माध्यमातून केंद्र सरकारने लोकांनी खोट्या आश्वासनांना बळी पडू नये. तसेच कॉल, मेसेज किंवा ईमेलच्या माध्यमातून एखाद्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले असेल तर ते ही करु नका असा सल्ला दिला आहे.

कशी होते फसवणूक
कोव्हिड-१९ चे कारण देत चमत्कारी उपचार, हर्बल उपचार, लस आणि तातडीने तपासणीच्या नावाखाली ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. आरोग्य विषयक सल्ले किंवा आधी तातडीने पैसे देण्याची मागणी या लोकांकडून केली जाते. अशाप्रकारच्या संशयित कॉल्स, ईमेल्स आणि टेक्सट मेसेजला उत्तर देऊ नका, असे सायबर दोस्तने म्हटले आहे. अशाप्रकारचा कोणताही मेसेज अथवा ईमेल अथवा फोन आल्यास त्याची माहिती सायबर पोलिसांना द्या, असे सांगण्यात आले आहे.

अमेरिकेचा सौदी अरेबियाला दणका

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या