24.8 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeराष्ट्रीयदैनिक भास्करची ७०० कोटींची कर चोरी

दैनिक भास्करची ७०० कोटींची कर चोरी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आयकर विभागाने दैनिक भास्कर ग्रुपच्या अनेक कार्यालयावर धाड टाकली होती. करचोरी प्रकरणी ही धाड टाकण्यात आल्याचे त्यावेळी आयकर विभागाकडून सांगण्यात आले होते. आता याबाबत माहिती समोर येत असून आयकर विभागाने सांगितले की, दैनिक भास्कर ग्रुपवर टाकण्यात आलेल्या धाडींमध्ये जवळपास ७०० कोटी रुपयांची कर चोरी, शेअर बाजाराच्या नियमांचे उल्लंघन आणि यादीतील कंपन्यांकडून लाभात फेरफार केल्याचे पुरावे सापडले आहेत. कर चोरीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अजुनही या प्रकरणाची चौकशी आयकर विभागाकडून केली जात आहे.

आयकर विभागाने टाकलेल्या धाडीनंतर हे राजकीय सूड भावनेतून होत असल्याचा आरोप केंद्र सरकारवर विरोधकांनी केला होता. आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, धाडीत अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. यामध्ये कर्मचा-यांच्या नावावर अनेक कंपन्या चालवल्या जात असल्याची माहिती आयकर विभागाने दिली आहे. या कंपन्यांचा वापर बनावट खर्चाचे बुकिंग आणि इतर व्यवहारांसाठी केला जात होता. काही कर्मचा-यांना भागधारक आणि संचालकही करण्यात आले होते़

या कर्मचा-यांनी मान्य केले आहे की, त्यांच्या नावाने चालवण्यात येणा-या कंपन्यांबाबत कोणतीही माहिती त्यांना नाही. तसेच, त्यांनी आधार कार्ड आणि डिजिटल स्वाक्षरी कंपनीला विश्वासाने दिले होते. काही नातेवाईक असेही आढळले ज्यांनी स्वत:हून आणि जाणीवपूर्वक कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या. मात्र त्यांना ज्या कंपन्यांचे संचालक, भागधारक केले होते तिथे काय चालते याची माहिती दिली नव्हती.

निनावी व्यवहारांचीसुद्धा चौकशी करणार
आयकर विभागाने सांगितले की, बनावट कंपन्यांचा वापर खोटा खर्च दाखवण्यासाठी, तसेच, कंपन्यांच्या नफ्यात फेरफार करणे यासाठी करण्यात आला. या कंपन्यांबाबत सेबीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचेही आढळून आले आहे. निनावी व्यवहारांचीसुद्धा चौकशी करण्यात येणार असल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे.

१५ टक्के शुल्ककपात; सुप्रीम कोर्टाचा राज्यातील पालकांना दिलासा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या