23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयदलित सगळे मतलबी

दलित सगळे मतलबी

एकमत ऑनलाईन

लखनौ : बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी विश्वासघातकी आणि विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. मायावतींनी रविवारी एकामागून एक असे तीन ट्विट केलेत.

मायावतींनी ट्विटमध्ये लिहिले आहे की बसपाला कमकुवत करण्यासाठी जातीयवादी शक्ती पडद्याआडून कट रचत आहेत. बसपाला संपवण्यासाठी अनेक संघटना तयार करण्यात आल्या आहेत. त्यांचा खरा हेतू त्यांचा स्वार्थ सिद्ध करणे हा आहे. या ट्विटद्वारे त्यांनी भाऊ आनंदचेही कौतुक केले आहे.

मायावतींनी लिहिले आहे की, दलित आणि उपेक्षितांमध्ये स्वार्थी लोकांची कमतरता नाही, यात माझ्या काही नातेवाईकांचाही समावेश आहे. माझ्या गैरहजेरीत माझ्या दिल्लीतील निवासस्थानावर सीबीआयने छापा टाकल्यानंतर कुटुंबातील काही सदस्य माझ्यापासून दूर गेले. मात्र, लहान भाऊ आनंद मला सोडून गेला नाही. त्याने सरकारी नोकरी सोडून कुटुंबासमवेत माझी सेवा केली आणि पक्षाच्या कामातही तो सक्रिय झाला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या