28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयलखीमपूरमध्ये शेतक-यांनंतर दलितांची हत्या

लखीमपूरमध्ये शेतक-यांनंतर दलितांची हत्या

एकमत ऑनलाईन

लखीमपूर खेरी : येथील निघासन पोलिस स्टेशन हद्दीतील लालपूर माजरा तमोली पूर्वा गावात अनुसूचित जातीच्या दोन अल्पवयीन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. त्यानंतर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी या प्रकरणावरून भाजपवर निशाणा साधला आहे.

प्रियंका गांधी यांनी एका बातमीचा हवाला देत ट्विट केले की, लखीमपूर येथे दोन बहिणींच्या हत्येची घटना हृदयद्रावक आहे. वृत्तपत्र आणि टीव्हीवर दररोज खोट्या जाहिराती दिल्याने कायदा आणि सुव्यवस्था चांगली होत नाही. शेवटी, उत्तर प्रदेशात महिलांवरील गुन्हे का वाढत आहेत? सरकारला कधी जाग येणार? असा प्रश्न त्यांनी केला आहे. तर त्या घटनेवर अखिलेश यादव यांनी ट्विट करून म्हटले होते की, निघासन पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन दलित बहिणींचे अपहरण करून त्यांची हत्या केली. आणि त्यानंतर पंचनामा आणि संमतीशिवाय त्यांचे शवविच्छेदन करण्यात आल्याचा पोलिसांवर पिडीतांच्या वडिलांचा आरोप अत्यंत गंभीर आहे. योगी सरकारवर निशाणा साधत यादव म्हणाले की, लखीमपूरमध्ये शेतक-यांनंतर आता दलितांची हत्या होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या