22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयफोगाट यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मुलीची मागणी

फोगाट यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मुलीची मागणी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अभिनेत्री आणि भाजपच्या नेत्या सोनाली फोगाट यांच्या आकस्मात मृत्यूची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी त्यांची मुलगी यशोधरा फोगाट हीन केली आहे. सध्या गोवा पोलिसांकडून सुरु असलेल्या या प्रकरणाच्या चौकशीवर कुटुंबीय समाधानी नसल्याचे तीने म्हटले आहे.

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आश्वासन दिले आहे असेही यशोधरा हीने सांगितले आहे. सोनाली फोगाट यांच्या कुटुंबियांनी २७ ऑगस्ट रोजी सीएम खट्टर यांची भेट घेतली होती. यानंतर जर फोगाट यांच्या कुटुंबियांनी सीबीआय चौकशीची मागणी केली तर तसे निर्देश आम्ही देऊ असे म्हटले होते.

दरम्यान, अद्याप या प्रकरणी कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही, असा आरोप सोनाली यांच्या मुलीने केला आहे. आरोपीला गोव्यात ठेवण्यात आले असून त्यांचा या हत्येमागचा हेतू काय होता हे अद्याप आम्हाला सांगण्यात आलेले नाही. मग पोलिस नक्की काय करताहेत? माझ्या आईला न्याय मिळवून देण्यासाठी हे सर्व सुरु आहे. जोपर्यंत या प्रकरणाची सीबीआय चौकशी होत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या