कोची : केरळमधील सोने तस्करी प्रकरणात मोस्ट वॉण्टेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा सहभाग असल्याची शंका राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) व्यक्त केली आहे. एनआयएने कोचीमधील विशेष न्यायालयात ही माहिती दिली आहे.
सोन्याच्या तस्करीतून मिळणारा पैसा भारतविरोधी तसेच, दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांकडून व्यक्त करण्यात आली असल्याची माहिती एनआयएने दिली असून, सोने तस्करीतील आरोपींच्या जामीनाला विरोध केला. काही आरोपींचे दाऊद इब्राहिमशी संबंध असून, यानिमित्ताने अनेकदा टंझानियाचा दौरा त्यांनी केला होता, अशी माहिती एनआयएने कोर्टाला दिली आहे. दाऊदचा टांझानियात हि-यांचा व्यवसाय असून फिरोज नावाची व्यक्ती सर्व व्यवहार पाहत असल्याचा गुप्तचर यंत्रणांचा रिपोर्ट असल्याचेही एनआयएने सांगितले.
जुलै महिन्यात वेगवेगळ्या माध्यमातून जवळपास ३० किलो सोन्याची तस्करी करण्यात आली आहे. थिरुअनंतपुरम विमानतळावरुन हे सोने जप्त करण्यात आले. हे सोने संयुक्त अरब अमिरातीमधील दुतावासात पाठवले जात होते. कोणत्या माध्यमातून सोन्याची तस्करी करण्यात आली याचा तपास करायचा असल्याने आरोपींना कोठडीत ठेवणे गरजेचे असल्याचा युक्तिवाद एनआयएकडून करण्यात आला. एनआयएकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एक असणा-या रमीज याने चौकशीदरम्यान आपला टंझानियामध्ये हि-यांचा व्यवयास असून, तेथून सोने आणले होते आणि युएईमध्ये विकले असा दावा केला आहे.
दीड वर्ष पत्नीला शौचालयात कोंडले