25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयकोरोनावरील व्हिराफीन औषधाला डीसीजीआय ची मान्यता

कोरोनावरील व्हिराफीन औषधाला डीसीजीआय ची मान्यता

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात आता कोविशिल्ड आणि कोवॅक्सिननंतर झायडस कॅडिलाच्या व्हिराफीन नावाच्या औषधाची मोठी चर्चा होत असून, व्हिराफीनला शुक्रवार दि़ २३ एप्रिल रोजी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया(डीसीजीआय)ने आपत्कालीन परिस्थितीकरीता वापरास मान्यता दिली आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीसीजीआयने आपत्कालीन वापरासाठी झायडस कॅडिला कंपनीच्या ‘व्हिराफीन’ या औषधाला कोरोनाच्या उपचारांसाठी आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.

कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर रामबाण ठरणारे औषध डीसीजीआयने मंजूरी दिली आहे. झायडल कॅडिला या कंपनीचे म्हणणे आहे की, हे औषध घेतल्यानंतर ७ दिवसांच्या आत रुग्णांची आरटी पीसीआर टेस्ट निगेटीव्ह आली असून ९१.१५ टक्के रुग्णांवर याचा परिणाम दिसून आला आहे. कोरोनाचा हाहाकार सध्या देशभरात सुरु आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असून, सध्या परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारतात जवळपास अडीच लाखांहून अधिक रुग्ण सापडत असून, अलिकडे तर तीन लाखांच्या वर दैनंदिन रुग्णांचा आकडा पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाविरोधातल्या लढ्यामध्ये सध्या आपल्याकडे फक्त लशींचा वापर केला जात आहे. भारतात सर्वांत आधी सीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही लस मान्यताप्राप्त ठरली होती. आतापर्यंत कोरोनाविरोधातील लढ्यासाठी कसल्याही प्रकारचे औषध उपलब्ध झाले नव्हते. मात्र, आता यासंदर्भात दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

९० टक्क्यांहून अधिक परिणामकारक
कंपनीचा असा दावा आहे की, व्हिराफीनने हे औषध १८ वर्षांहून अधिक वय असलेल्या सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर परिणामकारक ठरलेलं आहे. क्लिनीकल ट्रायलमध्ये या औषधाचे ९१.१५ टक्क्यांपर्यंत रिझल्ट्स मिळाले आहेत. त्यामुळे रुग्णाला योग्यवेळी हे औषध दिल्यास कोरोनापासून त्याचा बचाव होण्याची शक्यता वाढली आहे.

औषधाचा होत आहे तात्काळ परिणाम
कंपनीने म्हटले आहे की, तिस-या टप्प्यातील मानवी चाचणी भारतातील २० ते २५ केंद्रांमधील २५० रुग्णांवर केली गेली होती. याचे विस्तृत निष्कर्ष लवकरच प्रकाशित केले जातील. गेल्या आठवड्यात कंपनीकडून जाहीर केलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, कोरोनाचे संक्रमण झाल्यानंतर लगेचच हे औषध घेतल्यास रुग्णांना गतीने बरे होण्यास मदत होते.

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा; शरद पवारांचे १९० साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीचे आदेश

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या