23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयकर्करोगाला अधिसूचित आजार घोषीत करा

कर्करोगाला अधिसूचित आजार घोषीत करा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कर्करोगाला अधिसूचित आजार घोषीत करण्याची शिफारस केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या संसदीय समितीने केली आहे. राज्यसभेच्या सभापतींकडे सोमवारी याचा अहवाल सुपूर्द करण्यात आला. कर्करोगाचा अद्याप अधिसूचित आजारात समावेश करण्यात आला नसल्याने या आजाराने होणा-या मृत्यूंची नोंद योग्य प्रकारे होत नाही.

‘कॅन्सर केअर प्लॅन अँड मॅनेजमेंट, प्रिवेंशन, डाग्नोसिस रिसर्च अँड अ‍ॅफोर्डिबिलीटी ऑफ कॅन्सर ट्रीटमेंट’ वर आधारित १३९ व्या अहवालात ही शिफारस करण्यात आली आहे. समितीने म्हटले आहे की, कर्करोगाला अद्याप अधिसूचीत आजार म्हणून घोषित करण्यात आलेले नसल्याने यामुळे होणा-या मृत्यूंची नोंद कमी होत आहे.

समितीने म्हटले आहे की, कर्करोगाच्या मृत्यूंच्या आकड्यांमध्ये स्पष्टता नसते. अधिसूचित आजार नसल्याने याच्या डेटा संकलनात मोठी अडचण येते. या समस्येची सरकारला आठवण करुन देण्यात आली आहे. मृत्यूचे ख-या कारणाचा उल्लेख केल्याशिवाय अनेकदा मृत्यूचे कारण केवळ कार्डिओ-रेस्पिरेटरी फेल्युअर झाल्याचे सांगितले जाते. समितीने सरकारला सूचवले आहे की, रुग्णालयांमध्ये कर्करोगाने मृत्यूचे ख-या आकड्यांची नोंद झाल्यास या आजाराची देशातील खरी स्थिती समोर येईल. या आकडेवारीमुळे कर्करोगावर निदान, उपचारात सहकार्य होईल.

कोविन सारखे अ‍ॅप असावे
समाजवादी पार्टीचे खासदार रामगोपाल यादव यांच्या अध्यक्षतेखालील समितीने कर्करोगाच्या रुग्णांचा रिअल टाईम रेकॉर्ड ठेवण्यासाठी कोवीनसारखे पोर्टल बनवण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे कर्करोगाच्या आजारात वापरली जाणारी उपकरणे आणि इतर साधनांची माहिती देखील दिली जाईल.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या