22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयभारत हिंदूराष्ट्र घोषित करा; दहशतवाद थांबेल

भारत हिंदूराष्ट्र घोषित करा; दहशतवाद थांबेल

एकमत ऑनलाईन

तिरुअनंतपूरम : भारतात चालू असलेला इस्लामिक दहशतवाद रोखण्यासाठी देशाला तत्काळ हिंदूराष्ट्र घोषित करा, अशी मागणी केरळमधील एका आमदाराने केली आहे. विशेष म्हणजे ही मागणी करणारा आमदार भाजपचाही नाही व हिंदूही नाही.

केरळ जनपक्षम (सेक्यूलर)असे नाव असलेल्या पक्षाचे ख्रिश्चन आमदार पीसी जॉर्ज यांनी ही मागणी केली आहे. केरळमधील माकपच्या नेतृत्वाखालील डावी लोकशाही आघाडी व काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी या दोन आघाड्यांकडून केरळमध्ये इस्लामी दहशतवाद्यांना मोकळे रान सोडले असून २०३० पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनविण्याचा त्यांचा इरादा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

इडुक्की जिल्ह्यातील एका बैठकीत जॉर्ज बोलत होते. लव्हजिहाद ही सध्या केरळसमोरील सर्वात मोठी समस्या असून एलडीएफ व युडीएफ या दोन्ही आघाड्यांची त्याला मुकसंमती आहे. त्याच्या बळावरच इस्लामी दहशतवाद्यांकडून भारताला इस्लामिक राष्ट्र बनविण्याचा प्रयत्न सुरु आहे.मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी केल्याने त्याला खीळ बसली व त्यांनी त्यांचा प्लॅन काहीकाळासाठी पुढे ढकलला असल्याचे मत त्यांनी मांडले आहे.

जगातील प्रत्येक राष्ट्र धार्मिक
जॉर्ज यांनी आपल्या संबोधनात भारताला हिंदूराष्ट्र घोषित करण्याबाबत आणखीही एक तर्क दिला. जगातील प्रत्येक राष्ट्र मग ते इंग्लंड असो की अमेरिका ते धार्मिक राष्ट्र आहे. मग जगभरातील एकुण हिंदुंपैकी ७० टक्के हिंदू ज्या देशात आहेत, तो भारत हिंदूराष्ट्र म्हणून घोषित करण्यात गैर काय? असा सवालही त्यांनी केला आहे.

आम्ही पुन्हा आंदोलन करु – राकेश टिकैत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या