26.1 C
Latur
Tuesday, January 26, 2021
Home आंतरराष्ट्रीय सौदीकडून कच्चे तेलाच्या वितरणात घट?

सौदीकडून कच्चे तेलाच्या वितरणात घट?

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारताला कच्चे तेल पुरवणारा सौदी अरेबिया देश तेलाच्या वितरणात घट करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम आता देशातील सर्वसामान्यांना महागाई रुपात मिळण्याची दाट शक्यता असल्याचे दिसून येत आहे़ कच्चा तेलाच्या वितरणात घट केल्यामुळे मालाच्या दळणवळनात मोठा अडथळा आणि खर्च होणार असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंपासून सर्व प्रकारच्या वस्तू महागणार आहेत.

कोरोना संकट काळात देशात पेट्रोल, डिझेलच्या दरात स्थिरता होती. मात्र, आता पेट्रोल, डिझेलचे दर वाढण्याची शक्यता आहे. कारण भारताला कच्चे तेल पुरवणारा सौदी अरेबिया देश तेलाच्या वितरणात घट करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे याचा थेट परिणाम मागणी आणि वितरणाच्या साखळीवर पडू शकते. कच्च्या तेलाच्या वितरणात घट झाल्यास पेट्रोल, डिझेलचे दर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या आयुष्यात पडू शकतो. कारण महागाई वाढू शकते.

कोरोना संकट काळात कच्च्या तेलाच्या मागणीत स्थिरता होती. भारतासह इतर देशांमध्येही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. मात्र, आता सौदी अरेबियाच्या एका निर्णयाने भारतासह इतर देशांमध्येही महागाई वाढू शकते. सौदी अरेबियाने फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कच्च्या तेलाच्या उत्पादनात घट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वितरणात मोठा फटका बसू शकतो.

महागाई कशी वाढणार?
– सौदी अरेबिया देश कच्च्या तेलाच्या वितरणात घट करु शकतो. त्यामुळे फेब्रुवारीपासून तेलाच्या दरात वाढ होऊ शकते. तेलाचे दर वाढल्यानंतर परिवहन क्षेत्राला याचा मोठा फटका बसू शकतो.
– त्याचबरोबर महागाईदेखील वाढू शकते. कारण ट्रान्सपोर्टचा खर्च वाढल्यास त्याचा थेट परिणाम इतर उत्पादनांवर पडू शकतो. त्यामुळे महागाई वाढू शकते. विशेष म्हणजे भाज्यांचे दर वाढू शकतात.
– कोरोना संकट काळात भाज्यांचे दर स्थिर आहेत. कांदा आणि टोमॅटोचे दर सोडले तर इतर सर्व भाज्यांचे दर सध्या स्थिर आहे. तेलच्या वितरणात घट झाल्यास भाज्यांच्याकिंमतीवर त्याचा थेट परिणाम पडू शकतो.

पोलिस भरतीचा मार्ग मोकळा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,417FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या