नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्गात काहीशी घट झाली आहे. सलग दुस-या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. देशात गेल्या २४ तासांत १५ हजार ५२८ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय सोमवारी दिवसभरात २५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी देशात १६ हजार ९३५ नवीन रुग्णांची नोंद आणि ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्याआधी सलग चार दिवस वीस हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद झाली होती.