23.1 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home राष्ट्रीय वादग्रस्त इमरती देवींचा पराभव

वादग्रस्त इमरती देवींचा पराभव

एकमत ऑनलाईन

भोपाळ : मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीतील २८ जागांपैकी सर्वात वादग्रस्त निवडणुक ग्वाल्हेर जिल्ह्यातील डबरा मतदारसंघातील ठरली होती. डबरामधून भाजपाच्या तिकीटावर न्विाडणुक लढविणा-या इमरतीदेवी यांना वादांचा काहीच फायदा न होता त्या मोठ्या मतांच्या फरकाने काँग्रेसच्या उमेदवाराकडून पराभूत झाल्या आहेत.

प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सभेत त्यांना आयटम म्हटल्यानंतर इमरती देवी चर्चेत आल्या होत्या.कमलनाथ यांच्या वरही या वक्तव्यामुळे देशभरात टीकेची झोड उठली होती. मात्र वादानंतर मिळालेल्या सहानुभूतीचा खुद्द इमरतीदेवींना फायदा न झाल्याचे दिसून आले आहे. काँग्रेसचे उमेदवार सुरेश राजे यांनी इमरती देवी यांचा ७,६३३ मतांच्या फरकाने पराभव केला.

दहशतवाद्यांकडून ५० लोकांची निर्घृण हत्या

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,437FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या