नवी दिल्ली : व्हॉटस्अॅपने या वर्षांच्या सुरुवातीलाच नवे गोपनीयता धोरण सादर केले आहे. जर तुम्ही या अटी-शर्ती अमान्य केल्या तर तुमचे अकाऊंट डिलीट केले जाईल, असे सांगण्यात आले होते़ दरम्यान, व्हॉटस्अॅपवरील मेसेजेस, चॅट्स व युजर्सचा डेटा आता सुरक्षित राहिलेला नाही. हा सर्व डेटा आता फेसबुक आणि इन्स्टाग्रामसोबत शेअर केला जाणार आहे, अशा आशयाच्या बातम्या गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून सातत्याने प्रसिद्ध होत आहेत. त्यामुळे व्हॉटस्अॅपविरोधात युजर्समध्ये तीव्र नाराजी आहे.
दरम्यान, व्हॉटस्अॅपविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने म्हटले आहे की, या प्रकरणावर तपशीलवार सुनावणी होणे आवश्यक आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २५ जानेवारी रोजी होणार आहे. तसेच न्यायालयाने यावर म्हटले आहे की, व्हॉटस्अॅप हे एक खासगी अॅप आहे. जर तुम्हाला तुमच्या गोपनियतेची अधिक चिंता असेल तर तुम्ही व्हॉटस्अॅप वापरणे सोडून द्यायला हवे आणि इतर अॅप्स वापरणे सुरु कराव. ही एक ऐच्छिक गोष्ट आहे.
यासंदर्भात याचिका दाखल करताना याचिकाकर्त्याने मागणी केली होती की, व्हॉटस्अॅपमुळे लोकांची गोपनीयता धोक्यात आली आहे. त्यामुळे सरकारने याविरोधात कडक पाऊल उचलायला हवे. कारण हे अॅप राज्यघटनेने दिलेल्या गोपनीयतेच्या मूलभूत अधिकाराच्या विरोधात आहे. व्हॉट्सअॅप सामान्य नागरिकांशी संबंधित वैयक्तिक माहिती इतर प्लॅटफॉर्म्सवर शेअर करू इच्छित आहे, हे थांबवणे आवश्यक आहे.
व्हॉटस्अॅपने नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच एक नवे धोरण सादर केले आहे. त्यानुसार कंपनी युजर्स जो कंटेंट व्हॉटस्अॅपवर शेअर करत आहे, स्वीकारतोय (जो डेटा त्याच्यासोबत शेअर केला जातोय), युजर जो डेटा साठवून ठेवतो आहे, तो डेटा किंवा तो कंटेंट कंपनी वापरु शकते, शेअर करु शकते. कंपनीचे हे धोरण स्वीकारणे युजर्सना भाग आहे. कंपनीने या अटी-शर्तींखाली केवळ दोनच पर्याय दिले आहेत. कंपनीचे नवे धोरण म्हणजेच नव्या अटी-शर्ती स्वीकारा अथवा स्वीकारु नका. जर तुम्ही कंपनीच्या नव्या अटी मान्य केल्या नाहीत तर तुमचे अकाऊंट बंद केले जाऊ शकते.
समीर खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी