24.2 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयदिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक

दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना ईडीकडून अटक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्लीचे आरोग्य मंत्री आणि आम आदमी पक्षाचे (आप) ज्येष्ठ नेते सत्येंद्र जैन यांना ईडीने अटक केली आहे. ईडीने आधी सत्येंद्र जैन यांना ताब्यात घेतले आणि नंतर मनी लाँड्रिंग प्रकरणात त्यांची चौकशी केली. त्यानंतर काही वेळातच त्यांना अटक करण्यात आली.

जैन यांना ४ कोटी ८१ लाख रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आली आहे. २०१४-१५ मध्ये सत्येंद्र जैन मंत्रिपदावर असताना त्यांनी आणि त्यांच्या सहका-यांनी कलकत्त्याच्या शेल कंपन्यांकडून पैसे घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करून अनेकवेळा त्यांची चौकशी केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सत्येंद्र जैन यांना या संदर्भात विचारणा केली असता, प्रश्नाची योग्य उत्तर देत नव्हते. माहिती लपवत होते. या कारणावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या