29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home राष्ट्रीय सोनिया, राहुल गांधींना दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस

सोनिया, राहुल गांधींना दिल्ली उच्च न्यायालयाची नोटीस

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नॅशनल हेराल्ड प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने खालच्या न्यायालयाच्या सुनावणीला स्थगिती दिली आहे. याच बरोबर न्यायालयाने सोमवारी आरोपी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी तथा इतर काही मंडळींना नोटीस बजावत, भाजप खासदार सुब्रमण्यन स्वामी यांच्या याचिकेसंदर्भात उत्तरही मागितले आहे. खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनी नॅशनल हेराल्ड प्रकरणी खालच्या न्यायालनाने दिलेल्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

खालच्या न्यायालयाने स्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेतील मुख्य साक्षींच्या आधारे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी तसेच इतरांवर खटला चालविण्याची परवानगी देण्यास नकार दिला होता. आता न्यायमूर्ती सुरेश कैत यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी, एआयसीसी महासचिव ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे, सॅम पित्रोदा आणि यंग इंडिया (वायआय) यांच्याकडून १२ एप्रिलपर्यंत स्वामींच्या याचिकेवर उत्तर मागवले आहे.

मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या