नवी दिल्ली : १२ फेब्रुवारीपासून दिल्ली-वडोदरा-मुंबई एक्स्प्रेस वेवर वाहने धावू शकतील. गुरुग्राममधील अलीपूर गाव ते राजस्थानमधील दौसा दरम्यानचा २२० किलोमीटरचा महामार्ग पूर्ण झाला आहे. त्याचे उद्घाटन १२ फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.
मुख्य कार्यक्रम दौसा येथे होणार आहे, मात्र त्यापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांच्या उपस्थितीत गुरुग्राममध्येही कार्यक्रम होणार आहे.
मुंबईचा प्रवास १२ तासांत
वास्तविक दिल्ली-वडोदरा-मुंबई एक्स्प्रेसवे पूर्ण झाल्यानंतर दिल्ली ते मुंबई हा प्रवास कारने अवघ्या १२ तासांत पूर्ण होईल. सध्या मुंबईला पोहोचण्यासाठी २४ तास लागतात. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता डीव्हीएम एक्स्प्रेसवेच्या उद्घाटनानिमित्त हा एक्सप्रेसवे गुरुग्रामच्या सोहना शहरातील अलीपूर गावपासून सुरू होईल.