नवी दिल्ली : पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणाचे धागेरदोरे महाराष्ट्र आणि बीड जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. दिल्ली पोलिसांनी मुंबई उच्च न्यायालयात वकिली करणा-या निकीता जेकब आणि बीडमधील अभियंता शंतनू मुळूक यांच्यावर आरोप केलेले आहेत. याप्रकरणी दोघांचीही आज दिल्ली पोलिसांनी चौकशी केली.
बंगळुरूतील दिशा रवीनंतर मुंबईतील वकील निकीता जेकब यांच्याबरोबरच बीड जिल्ह्यातील असलेल्या शंतनू मुळूक यांचाही टूलकिट प्रकरणात सहभाग असल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केलेला आहे. याप्रकरणात पोलिसांनी शंतनू यांच्या घराची झाडाझडतीही घेतली होती. तसेच दिल्लीतील न्यायालयाने शंतनू विरोधात अटक वॉरंट जारी केले होते़ दरम्यान, शंतनूला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंठपीठाने अंतरिम जामीन दिलेला असून, शंतनूने पोलिसांना चौकशी सहकार्य करणार असल्याचे सांगितले होते़
त्यानुसार आज शंतनूची दिल्ली पोलिसांनी चौकशी केली. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने शंतनूची चौकशी केली. द्वारका येथील पोलिसांच्या कार्यालयात शंतनूची चौकशी करण्यात आल्याचे एका वरिष्ठ पोलिस अधिका-याने सांगितले. निकीता जेकब आणि शंतनू मुळूक या दोघांनाही चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली होती. त्यांच्यावर असलेल्या आरोपांप्रकरणी आज चौकशी करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
रॉबर्ट वाड्रांनी सायकलवरून गाठले कार्यालय