25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयदिल्ली विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होणार

दिल्ली विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोनाने हाहाकार माजवला असून, राजधानी दिल्लीत आणीबाणीची स्थिती उद्धभवली आहे. येथे रोज हजारोंच्या घरात नवे बाधित सापडत आहेत. तर तितकेच मरत आहेत. ही स्थिती पाहूनच पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या परिक्षा काही काळांसाठी पुढे ढकलण्याचा आणि त्या ऑनलाईन घेण्याचा निर्णय दिल्ली विद्यापीठाने घेतला आहे.

याच्या आधी पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या सेमिस्टर परीक्षा या १५ मे पासून सुरू होणार होत्या. मात्र आता त्या १ जून २०२१ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भात दिल्ली विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डी. एस रावत म्हणाले की, २ मे २०२१ रोजी सर्व विभागांच्या प्रमुखांसमवेत बैठक झाली आहे. या बैठकीत परीक्षा १ जूनपर्यंत थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर नवीन तारखा १ जूनच्या आधी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य
तसेच १ जूननंतर या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे रावत म्हणाले. तर याच्या आधीही गेल्या वर्षीही कोरोनामुळे दिल्ली विद्यापीठाकडून परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. मात्र या यावेळी परीक्षा ओपन बुक फॉरमॅट मध्ये घेण्यात येणार आहेत. त्याचबरोबर इतर सेमिस्टर परीक्षांचा निर्णयही लवकरच विद्यापीठाकडून घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे.

अमेरिका, यूके आणि जर्मनीकडून मदत भारतात दाखल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या