24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयअल्फाच्या तुलनेत डेल्टा ६० टक्के घातक

अल्फाच्या तुलनेत डेल्टा ६० टक्के घातक

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट, कोरोनाच्या अल्फा व्हेरिएंटपेक्षा ४०-६० टक्के जास्त वेगाने पसरतो. हा दावा भारतीय सार्स कोव्ह २ जीनोमिक्स कंसोर्टियम (आयएनएसएसीओजी)चे सह-अध्यक्ष डॉ. एनक़े़ अरोरा यांनी केला आहे. तसेच, आज आढळणा-या नवीन कोरोना रुग्णांपैकी ८० टक्के रुग्णांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळतो, अशी माहितीही त्यांनी दिली.

डॉ. अरोरा यांनी सांगितले की, कोरोनाचा डेल्हा व्हेरिएंट अल्फा व्हेरिएंटच्या तुलनेत ४०-६० टक्के अधिक वेगाने पसरतो. तसेच, यूके, यूएसए, सिंगापूरसह ८० पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा हाच व्हेरिएंट असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच, भारतात सध्या उपलब्ध असलेल्या कोरोना व्हॅक्सीन या डेल्टा व्हेरिएंटवर प्रभावी असल्याची माहितीही त्यांनी दिली.
११ राज्यांत डेल्टा प्लस व्हेरिएंट

डॉ. अरोरा यांनी पुढे सांगितले की, डेल्टा प्लस व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटच्या तुलने अधिक धोकादायक आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट -एवाय.१ आणि एवाय.२ आतापर्यंत महाराष्ट्र, तमिळनाडू आणि मध्यप्रदेशासह ११ राज्यांत आढळला आहे. सध्या या व्हेरिएंट अभ्यास सुरू आहे. दरम्यान, कोरोनाच्या तिस-या लाटेबाबत सांगताता डॉ. अरोरा म्हणाले की, लसीकरण वाढवून आणि कोरोना नियमांचे पालन करुन कोरोनाची तिसरी लाट रोखता येईल.

ऑगस्टमध्ये देशात दररोज एक लाख रुग्ण सापडतील

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या