28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयकोरोनाचा ‘डेल्टा व्हेरिएंट’ राज्यातून नामशेष!

कोरोनाचा ‘डेल्टा व्हेरिएंट’ राज्यातून नामशेष!

एकमत ऑनलाईन

पुणे : महाराष्ट्रात फेब्रुवारी ते जून २०२१ या पाच महिन्यांदरम्यान दुस-या लाटेला कारणीभूत ठरलेल्या व लाखो नागरिकांना बाधित करून जवळपास ९० हजार नागरिकांचा जीव घेणारा कोरोनाचा ‘डेल्टा व्हेरिएंट’ आता राज्यातून नामशेष झाला आहे. राज्यातील काही नमुन्यांच्या जिनोम सिक्वेन्सिंग (जनुकीय क्रमनिर्धारण) मधून ही माहिती समोर आली आहे. यातून राज्याला कोरोनाबाबत एक प्रकारे दिलासाच मिळाला आहे.

राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात ९ मार्च २०२० रोजी सापडला. तो कोरोनाचा पहिला मूळ विषाणू होता. या विषाणूने आतापर्यंत विविध रूपे बदलली. त्यालाच कोरोनाचा उपविषाणू (सबव्हेरिएंट) असे म्हणतात. त्यापैकीच एक ‘डेल्टा’चा शिरकाव राज्यात नोव्हेंबर २०२० पासून व्हायला सुरुवात झाली होती. मात्र, त्याचा खरा प्रादुर्भाव हा फेब्रुवारी २०२१ पासून पाहायला मिळाला.

कोरोना मृतांच्या या कटू आठवणी मागे ठेवणारा हा डेल्टा व्हेरिएंट आता राज्यातूनच नामशेष झाल्याची माहिती महाराष्ट्रात जिनोम सिक्वेन्सिंग करणा-या प्रयोगशाळा ‘इंडियन सार्स कोविड जिनोमिक कॉन्सोर्टियम’चे समन्वयक तथा बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळा विभागाचे प्रमुख डॉ. राजेश कार्यकर्ते यांनी दिली.

काय आहे जिनोम सिक्वेन्सिंग?
– कोरोनासह प्रत्येक विषाणूची जनुकीय संरचना वेगळी असते. त्याची जनुकीय संरचना कशी आहे याचा शोध घेण्याची प्रक्रिया म्हणजे जिनोम सिक्वेन्सिंग होय.
– कोरोना हा सारखे नवीन रूप बदलतो. नवीन व्हेरिएंट त्याच्या रुग्ण बाधित होण्याचा वेग, लागण झाल्यावर मृत्यूचा दर किती वाढेल की तो सौम्य राहील याची माहिती आधीच या जिनोम सिक्वेन्सिंगद्वारे मिळू शकते.
– राज्यात गेल्या दोन वर्षांपासून प्रत्येक जिल्ह्यात आढळून येणा-या कोरोनाच्या एकूण रुग्णांपैकी ५ टक्के नमुन्यांचे जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात येते.

बीजेने शोधला होता ‘डेल्टा’
पुण्यातील बीजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेने देशात प्रथमच नोव्हेंबर २०२० मध्ये डेल्टा व्हेरिएंटचा शोध लावला होता. त्याचा अहवाल राज्य शासनाद्वारे केंद्राला कळवला होता. त्यावेळी केंद्राच्या नामांकित प्रयोगशाळांनादेखील त्याच्या विनाशक शक्तीचा अंदाज आला नव्हता. म्हणून तयारी कमी पडली अन् दुसरी लाट अधिक संहारक ठरली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या