21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeराष्ट्रीयडेल्टाचा कांजण्यांप्रमाणे होत आहे संसर्ग

डेल्टाचा कांजण्यांप्रमाणे होत आहे संसर्ग

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाने सर्वत्रच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्वच देश कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. कोरोनाग्रस्तांच्या संख्येने तब्बल १९ कोटींचा टप्पा पार केला असून, लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने थैमान घातले आहे. अनेक देशात डेल्टा व्हेरिएंटचा अत्यंत वेगाने प्रसार होत आहे. संशोधनातून आता पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कोरोनाचा डेल्टा व्हेरिएंट अत्यंत खतरनाक असून कांजण्यांप्रमाणे वेगाने संसर्ग पसरत असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे संक्रमणाचा वेग अधिक पटीने वाढला आहे.

कोरोना व्हायरसचा डेल्टा व्हेरिएंट इतरांपेक्षा अधिक गंभीर आहे. कांजण्यांप्रमाणे तो पसरत आहे. अमेरिकन आरोग्य प्राधिकरणाच्याअंतर्गत दस्तऐवजाचा हवाला देत, मीडिया रिपोर्ट्समध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. कोरोना लसीकरण झालेले आणि एकही लस न घेतलेल्या दोन्ही गटाकडून या व्हायरसचा प्रसार केला जाऊ शकतो, असे सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन अर्थातच सीडीसीने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे लसीकरण घेतलेल्या लोकांना देखील विशेष काळजी घेण्याच गरज आहे.

रिपोर्टनुसार, डेल्टा व्हायरसचा संसर्ग नाक आणि घशावाटे होतो. लसीकरण झालेले आणि लसीकरण न झालेले लोकं सारख्याच प्रमाणात या व्हायरसचा प्रसार करू शकतात. पण प्रत्येक वेळी असेच घडेल, हे मात्र नक्की नाही. डेल्टा व्हेरिएंट हा मर्स, सार्स, इबोला, सर्दी, फ्लू सारखा वेगाने पसरतो. हा व्हायरस कांजण्यांसारखाच संसर्गजन्य असल्याचे वृत्त द न्यूयॉर्क टाइम्सनेही दिले आहे.

तर जीवघेणासुध्दा होऊ शकतो : डब्ल्यूएचओ
जागतिक आरोग्य संघटनेने डेल्टा व्हेरिएंटबाबत धोक्याचा इशारा दिला आहे. कोरोना लसीकरणाचा वेग वाढवला नाही तर डेल्टा व्हेरिएंट अधिक धोकादायक ठरणार असून जीवघेणा होईल असे म्हटले आहे.

प्रसार कमी करणे गरजेचे
डेल्टा व्हेरिएंटमुळे परिस्थिती आणखी बिघडण्यापूर्वी त्याचा प्रसार कमी करावा लागेल. डेल्टा एक धोक्याचा इशारा आहे. हा व्हायरस पसरत आहे, पण याचे अधिक धोकादायक रूप समोर येण्यापूर्वी आपल्याला समजून घ्यावा लागेल असे देखील डब्ल्यूएचओने म्हटले आहे.

चार आठवड्यात सरासरी संसर्ग ८० टक्के
लसीकरण मोहिमेवर अधिक जोर देणे गरजेचे आहे नाहीतर हा धोका खूप वाढेल. त्यामुळेच सप्टेंबरच्या शेवटपर्यंत सर्व देशांनी आपल्या देशातील कमीतकमी १० टक्के लोकसंख्येचे लसीकरण करणे गरजेचे आहे, असे आवाहन डब्ल्यूएचओने केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. टेड्रॉस यांनी याबाबत भाष्य केले आहे. आतापर्यंत, चार चिंताजनक कोरोना व्हायरसचे प्रकार समोर आले आहेत आणि व्हायरस पसरत राहिल्याने आणखी येत राहतील. डब्ल्यूएचओच्या सहापैकी पाच क्षेत्रांमध्ये, गेल्या चार आठवड्यात सरासरी संसर्ग ८० टक्क्यांनी वाढला आहे, असे टेड्रॉस यांनी म्हटले आहे.

रुग्णसंख्येचा आलेख चढताच

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या