23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयजम्मू येथे वासुकी नाग मंदिराची तोडफोड

जम्मू येथे वासुकी नाग मंदिराची तोडफोड

एकमत ऑनलाईन

डोडा : जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात प्राचीन वासुकी नाग मंदिराची तोडफोड करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर हिंदू संघटना रस्त्यावर उतरल्या आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत मंदिराला लक्ष्य करणा-यांवर कारवाईची मागणी केली. वासुकी नाग मंदिर भदरवाहला भद्रकाशी असेही म्हणतात, रविवारी रात्री उशिरा किंवा सोमवारी पहाटे या मंदिरीत तोडफोड झाली.

गेल्या अनेक दिवसांपासून जम्मूमध्ये हिंदू मंदिरांना लक्ष्य केले जात आहे. यादरम्यान आता वासुकी नाग मंदिराची तोडफोड करण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की, सकाळी पुजारी जेव्हा मंदिरात पोहोचले तेव्हा त्यांना या घटनेचे माहिती मिळाल. मंदिराची बाहेरून आतपर्यंत तोडफोड करण्यात आली. मंदिराचे दरवाजे व खिडक्या तुटल्या असून मंदिरातील मूर्तीवरही दगडफेक करण्यात आली. पुजा-याने परिसरातील लोकांना आणि पोलि­सांना याची माहिती दिली. ही बातमी पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी झाली. मंदिरावरील हल्ल्याबद्दल लोकांनी संताप व्यक्त करण्यास सुरुवात केली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या