25.4 C
Latur
Monday, March 1, 2021
Home राष्ट्रीय भारतीय लष्कराकडून ड्रोनशक्तीचे प्रदर्शन

भारतीय लष्कराकडून ड्रोनशक्तीचे प्रदर्शन

लष्करी दिन संचलन; चीन-पाकिस्तानचा हल्ला ठरणार निष्प्रभ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: लष्कर दिनानिमित्त शुक्रवारी नवी दिल्लीत संचलनामध्ये लष्कराने शक्तिप्रदर्शन केले. यावेळी भारतीय लष्कराने प्रथमच आपल्याकडे असलेल्या ड्रोनची क्षमता जगासमोर आणली. हे ड्रोन कुठल्याही मानवी नियंत्रणाविना शत्रूच्या ठिकाणांना कसे लक्ष्य करतात, हे लष्कराने दाखवून दिले. भारताच्या या नव्या ड्रोनब्रिगेडमुळे चीन व पाकिस्तान या भारताच्या कट्टर वै-यांचे धाबे दणाणले असून त्यांचा कोणत्याही प्रकारचा हल्ला निष्प्रभ करण्याची क्षमता भारताकडे आली आहे.लष्कर दिनी झालेल्या संचलनावेळी अनेक ड्रोननी मिळून शत्रूचे टँक, दहशतवाद्यांचे तळ, हॅलिपॅड, फ्यूल स्टेशनसह अनेक ठिकाणांना लक्ष्य करण्याचे प्रात्यक्षिक दाखवले. प्रदर्शनात एकूण ७५ ड्रोन सहभागी झाले होते.

ड्रोन स्वॉर्मिंग प्रणालीची उपयुक्तता
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून हे ड्रोन कुठल्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय शत्रूच्या प्रदेशातील ५० किमी आतपर्यंत गेले आणि लक्ष्य ओळखून ते उदध्वस्त करण्यात यशस्वी झाले, असे संचलनात दाखवण्यात आले. हल्ल्याच्या या प्रकारात सर्व ड्रोन एकमेकांशी संपर्क साधत एकत्र मिळून मोहीम पूर्ण करतात, हे मोठे वैशिष्ट्य आहे. या तंत्राला ड्रोन स्वॉर्मिंग प्रणाली असे म्हणतात. भारतीय लष्कराने स्वदेशी कंपन्यांसोबत मिळून ड्रोन स्वॉर्मिंग प्रणालीचे प्रदर्शन केले. हे आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेल्या एका पावलाचे प्रतीक आहे. तसेच भविष्यात युद्ध कशा प्रकारे लढले जाईल याची झलक या माध्यमातून दाखवण्यात आली. आता अशा प्रकारचे तंत्रज्ञान हे जगभरातील युद्धाची पद्धत बदलत आहे.

मदर ड्रोन सिस्टिमचीही घातकता
आजच्या संचलनामध्ये मदर ड्रोन सिस्टिमसुद्धा दाखवण्यात आली. यामध्ये एका मदर ड्रोनमधून चार चाइल्ड ड्रोन बाहेर येतात. या ड्रोनचे लक्ष्य वेगवेगळे असते. हे चाइल्ड ड्रोन आपल्या लक्ष््याचा अचूकपणे भेद करतात.

पॅराड्रॉपिंगसाठी उपयुक्तता मोठी जमेची बाजू
ऑफेंसिव्ह ड्रोन ऑपरेशनच्या माध्यमातून भारतीय लष्कराने भारत तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुढे जात असल्याचे दाखवले. ड्रोन हे केवळ शत्रूच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी नाही तर पॅरा ड्रॉपिंगसाठीही उपयोगात आणता येऊ शकतात. ड्रोनच्या माध्यमातून कुठलेही सामाना पॅराशूटमधून ड्रॉप करण्याबरोबरच हे ड्रोन सामान घेऊन स्वत:ही उतरू शकतात. तसेच लँड झाल्यानंतर यांची सिस्टीम आपोआप बंद होऊ शकते. तिथे असलेले सैनिक आलेले सामान घेऊन दुसरे सामान त्या ड्रोनमध्ये भरू शकतो. त्यानंतर हे ड्रोन आपोआप सुरू होईल आणि आपल्या निश्चित ठिकाणी पोहोचू शकते. भारतीय सैनिक अनेक अशा ठिकाणी तैनात आहेत. जिथे हवामान प्रतिकूल असते. अशा ठिकाणी हे ड्रोन उपयुक्त ठरू शकतात.

निवडणुक लोकशाहीचा उत्सव : पालकमंत्री अमित विलासराव देशमुख

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या