24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयनोटाबंदीने करभरणा वाढला

नोटाबंदीने करभरणा वाढला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर देशातील कर भरणा प्रक्रियेस वेग आला असून, कर भरणा अधिक प्रमाणात झाल्याचे माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवार दि़ ८ नोव्हेंबर रोजी देशातील नोटाबंदीला ८ नोव्हेंबर रोजी ४ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त झालेल्या फायद्यांबाबत ट्विटद्वारे माहिती दिली. भारताला भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आश्वासन पाळण्यासाठी मोदी सरकारने चार वर्षांपूर्वी आजच्या दिवशी नोटाबंदी लागू केली होती. काळ्या पैशांवर अभूतपूर्व हल्ला करणारे पाऊल उचलल्याने चांगले कर नियोजन आणि डिजिटल अर्थव्यवस्थेला उभारी मिळाली.

सीतारामन म्हणाल्या, नोटाबंदीनंतर पहिल्या चार महिन्यांत ९०० कोटी रुपयांची अघोषीत मिळकत जप्त करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या तीन वर्षात ३,९५० कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली. सर्वेक्षणानंतर अनेक कोटी रुपयांची अघोषीत मिळकतीचा खुलासा झाला. आॅपरेशन क्लीन मनीमुळे अर्थव्यवस्था औपचारिक बनवण्यास मदत झाली. तसेच यामुळे बनावट चलनावरही अंकुश मिळवता आला असल्याचे सीतारामन म्हणाल्या.

नोटाबंदी जाणीवपूर्वकच : राहुल गांधी
पंतप्रधान तुमच्याकडून पैसे काढून घेऊन आपल्या ठराविक दोन-तीन मित्रांना देऊ इच्छित आहेत. नोटबंदीदरम्यान तुम्ही लाईनमध्ये उभे होता. परंतु मोदींचे मोठे उद्योगपती मित्र मात्र उभे नव्हते. तुम्ही तुमचे पैसे बँकांमध्ये टाकले आणि मोदींनी बँकांमधील ते पैसे आपल्या मित्रांना देऊन टाकले. त्यांचे कर्ज माफ केले. त्यांचे ३ लाख ५० हजार कोटी रूपयांचे कर्ज माफ करण्यात आले, म्हणजेच नोटाबंदी ही जाणीवपूर्वकच असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. आज भारतासमोर मोठे संकट आहे. सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. प्रश्न हा आहे की बांगलादेशची अर्थव्यवस्था भारताच्या पुढे कशी गेली. एक अशी वेळ होती जेव्हा भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वोत्तम अर्थव्यवस्था होती.

नोटाबंदीचे अपयश झाकण्यासाठी कोरोनावर खापर
अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याचे कारण कोरोना असल्याचे सरकारकडून सांगितले जाते़ परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव बांगलादेशमध्येही आहे. इतर देशांमध्येही आहे. मग भारतच यात मागे कसा राहिला? असा सवालही राहुल गांधी यांनी यावेळी केला.

मनमोहन सिंह यांचे बोल खरे ठरले
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी नोटबंदीमुळे भारतीय अर्थव्यवस्था दोन टक्क्यांपर्यंत नुकसान होणार असल्याचे सांगितले होते आणि तेच आपल्याला पाहायला मिळाले. पंतप्रधान म्हणतात की आम्ही काळ्या पैशाविरोधात लढू. परंतु हा लढा काळ्या पैशाविरोधात नव्हता. हा हल्ला तुमच्यावर होत आहे, असेही ते म्हणाले.

नोटाबंदीनंतर चुकीची जीएसटी
नोटबंदीनंतर मोदींनी चुकीच्या जीएसटीची अंमलबजावणी केली. मार्ग मोकळा करून दिला. दुकानदारांना संपवून टाकले. हा मार्ग कोणासाठी त्यांनी मोकळा केला? पंतप्रधानांनी पुन्हा आपल्या ठराविक उद्योगपती मित्रांसाठी याद्वारे मार्ग मोकळा केल्याचेही त्यांनी नमूद केले.

वेगवेगळया क्षेत्रात काम करताना तडजोडीसोबत आंनद कसा लुटायचा हे माणिक आईंनी शिकवले

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या