26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयनोटाबंदीने अर्थव्यवस्था बुडाली

नोटाबंदीने अर्थव्यवस्था बुडाली

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भाजप शासीत केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे देशातील अर्थव्यवस्था बुडाल्याचा आरोप रविवार दि. २९ मे रोजी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. विरोधी पक्षांनी रविवारी नोटाबंदीवरून नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, २०१६ च्या निर्णयाचे एकमेव दुर्भाग्यपूर्ण यश म्हणजे भारताची अर्थव्यवस्था बुडणे हेच आहे. राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) वार्षिक अहवालाचा हवाला देत मीडिया रिपोर्टचा स्क्रीनशॉट टॅग केला आहे, ज्यामध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटांमध्ये १०० टक्के आणि २००० रुपयांच्या बनावट नोटांमध्ये ५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटांवर बंदी घातल्यानंतर या दोन्ही नोटा जारी करण्यात आल्या आहेत.

टीएमसी नेतेही भडकले
तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनीही आरबीआयच्या अहवालावरून सरकारवर निशाणा साधला. टीएमसी नेत्याने ट्विटमध्ये म्हटले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी नमस्कार. नोटाबंदी आठवते? नोटाबंदीवर तुम्ही काय वचन दिले होते की, सर्व बनावट चलन नष्ट केले जातील? हा आहे आरबीआयचा नवा अहवाल, ज्यामध्ये बनावट नोटांची संख्या वाढल्याचे म्हटले आहे.

नोटाबंदीने संकट वाढले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जुन्या १००० आणि ५०० ​​रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याची घोषणा केली, ज्याचा उद्देश काळ्या पैशाला आणि दहशतवादाच्या वित्तपुरवठ्याला आळा घालणे होत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या