22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeआंतरराष्ट्रीयलोकप्रियतेत घट तरीही मोदीच सर्वोत्कृष्ट

लोकप्रियतेत घट तरीही मोदीच सर्वोत्कृष्ट

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना संकटाशी सामना करण्यात अपयशी ठरल्याची टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लोकप्रियतेत घट झाल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुणांकन जवळपास २० टक्क्यांनी घसरले आहे. मोदींच्या गुणांकनात घट झालेली असली तरी इतर जागतिक नेत्यांना त्यांनी मागे टाकले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचे सर्व्हेक्षणातून समोर आले आहे. अमेरिकास्थित डेटा इंटेलिजन्स कंपनी मॉर्निंग कन्सल्टने केलेल्या सर्व्हेक्षणात ही आकडेवारी समोर आली आहे.

जून महिन्यात मोदींचे गुणांकन ६३ टक्के इतके होते़ मात्र यावेळीही त्यांनी इतर नेत्यांना मागे टाकले असल्याचे कंपनीने सांगितले आहे. ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, भारत, इटली, जपान, मेक्सिको, दक्षिण-कोरिया, स्पेन, युनायटेड किंग्डम आणि अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षांच्या लोकप्रियतेसंदर्भातील माहिती आणि आकडेवारी गोळा करणा-या तसेच या देशातील प्रमुख नेत्यांना मान्यता देण्यासंदर्भात सर्वसामान्याचे मत जाणून घेणा-या मार्निंग कन्सल्टच्या ग्लोबल ऍप्रूवल रेटिंगची ताजी आकडेवारी समोर आली आहे.

मोदींच्या तुलनेत इतर नेत्यांचे गुणांकन
मारियो ड्रॅगी (इटली) – ६५ टक्के
एंड्रेस मॅन्युअल लोपेज ओब्रेडोर (मेक्सिको) – ६३ टक्के
स्कॉट मॉरिसन (ऑस्ट्रेलिया) – ५४ टक्के
अँजेला मार्कल (जर्मनी) – ५३ टक्के
जो बायडन (अमेरिका) – ५३ टक्के
जस्टिन ट्रूडो (कॅनडा) – ४८ टक्के
बोरिस जॉन्सन (युके) – ४४ टक्के
मून जे-इन (दक्षिण कोरिया) – ३७ टक्के
पेड्रो सांचेजÞ (स्पेन) -३६ टक्के
जायर बोल्सोनारो (ब्राझील) -३५ टक्के
इमैनुएल मॅक्रॉन (फ्रान्स) – ३५ टक्के
योशीहिदे सुगा (जपान) -२९ टक्के

तिस-या लाटेचा लहान मुलांना धोका नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या