23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeराष्ट्रीयगोन्साल्विसवरील आरोप तीन महिन्यांत निश्चित करा

गोन्साल्विसवरील आरोप तीन महिन्यांत निश्चित करा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी विशेष एनआयए न्यायालयाला भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी वरणन गोन्साल्विसवरील आरोप तीन महिन्यांत निश्चित करण्यास सांगितले. या खटल्यातील आरोपींनी दाखल केलेल्या दोषमुक्तीच्या अर्जांवर एकत्रितपणे निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने एनआयए न्यायालयाला दिले.

न्यायमूर्ती यूयू ललित आणि न्यायमूर्ती रवींद्र भट यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील आरोपी गोन्साल्विसच्या जामीन अर्जावर फेरविचार करताना हे निर्देश दिले. भीमा कोरेगाव प्रकरणातील फरार असलेल्या इतर आरोपींपासून कार्यकर्ते गोन्साल्विस यांच्यावरील खटला वेगळा करण्यासाठी योग्य पावले उचलण्याचे निर्देश खंडपीठाने एनआयएला दिले.

फरार आरोपींना फरारी गुन्हेगार नोटीस बजावण्याच्या सूचना खंडपीठाने केल्या. सुप्रीम कोर्टाने गोन्साल्विस यांच्या जामीन अर्जावर तीन महिन्यांनी सुनावणी घेण्यास सांगितले आहे. २०१९ च्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या गोन्साल्विस यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालय फेरविचार करत होते. यापूर्वी न्यायालयाने त्यांची जामीन याचिका फेटाळली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या