24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयआयआयटीकडून कोरोना चाचणी संच विकसित

आयआयटीकडून कोरोना चाचणी संच विकसित

-वीस मिनिटांत अहवाल मिळणार

एकमत ऑनलाईन

हैदराबाद: येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (आयआयटी) कोविड १९ चाचणी संच विकसित केला असून या किफायतशीर संचाच्या मदतीने वीस मिनिटांत चाचणी करता येते.

संशोधकांनी असा दावा केला, की ही पर्यायी चाचणी पद्धत रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमरेज चेन रिअ­ॅक्शन (आरटी-पीसीआर) पद्धतीपेक्षा वेगळी आहे. या संचाची किंमत ५५० रुपये असून, ती जास्त उत्पादनानंतर साडेतीनशे रुपयांपर्यंत खाली आणता येईल. या संचासाठी पेटंट घेण्यात येणार असून, इएसआयआयसी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल या हैदराबादच्या संस्थेत त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

Read More  आईसह दोन चिमुकल्यांचा अंत : कुत्र्याला वाचवण्याच्या नादात कार विहिरीत कोसळली

या संचाला मान्यता मिळण्यासाठी भारतीय वैद्यक संशोधन परिषदेकडे अर्ज करण्यात आला आहे. या चाचणी संचांच्या मदतीने वीस मिनिटांत निकाल हाती येतो. त्यात लक्षणे असलेल्या व नसलेल्या दोन्ही प्रकारच्या रुग्णांची चाचणी करता येते, अशी माहिती हैदराबाद आयआयटीचे प्राध्यापक शिव गोविंद सिंह यांनी दिली. हा कमी किमतीचा संच असून, कुठेही सहज नेता येतो.

संचाला आयसीएमआरकडून मान्यता
यातील चाचणी पद्धत वेगळी असून, त्यात कोविड १९ जनुक आराखड्यातील विशिष्ट भागाच्या क्रमवारीचा आधार घेण्यात आला आहे. आयआयटी दिल्लीने त्यांच्या पीसीआर आधारित चाचणी संचाला आयसीएमआरकडून मान्यता घेतली आहे.
हैदराबाद आयआयटी संस्थेने असा दावा केला, की सध्याच्या चाचणी प्रक्रिया या शोध प्रक्रियेवर आधारित आहे. आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली चाचणी ही शोध आधारित नसल्याने त्याची ंिकमत कमी आहे शिवाय त्यात अचूकतेशी तडजोड करण्यात आलेली नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या