21.2 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयपक्षी धडकेच्या घटनांनंतर डीजीसीएने केली मार्गदर्शक तत्वे जारी

पक्षी धडकेच्या घटनांनंतर डीजीसीएने केली मार्गदर्शक तत्वे जारी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अलीकडे विमानांवर पक्षी आदळल्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डीजीसीएने शनिवार दि. १३ ऑगस्ट रोजी आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने देशभरातील विमानतळांना पेट्रोलिंग करण्यास सांगितले आहे. सोबतच वन्यप्राण्यांची कोणतीही हालचाल दिसली तर याची माहिती वैमानिकाला द्यावी, असेही सांगितले आहे.

काय आहेत सूचना?
१ विमानतळांना वन्यजीवांपासून होणा-या धोक्यांचे मूल्यांकन करावे लागेल.
२ विमानांना संभाव्य धोका लक्षात घेऊन श्रेणी निश्चित करावी लागेल.
३ वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विमानतळांवर प्रक्रिया आणि नोंदी असणे आवश्यक आहे.
४ विमानतळावर किंवा सीमावर्ती भागात कोणत्याही प्राण्यांच्या हालचालींबद्दल वैमानिकांना सूचित केले पाहिजे.
५ वन्यजीव धोका व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत नियमित गस्त घालावी.
६ ही गस्त अशा प्रकारे असावी की जेणेकरून प्राण्यांची माहिती गोळा करता येईल.
७ वन्यप्राण्यांच्या हल्ल्याचा अहवाल महिन्याच्या ७ तारखेपर्यंत द्यावा.

अलीकडील घटना
१९ जून : स्पाइसजेटच्या दिल्लीहून १८५ प्रवाशांना घेऊन जाणा-या विमानाचे पाटणा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. पक्षी आदळल्याने विमानाचे इंजिन बिघडले होते.
४ ऑगस्ट : पक्षी धडकण्याच्या घटनेनंतर चंदीगडला जाणारे गो फर्स्ट विमान अहमदाबादला परतले.
५ ऑगस्ट : मुंबईकडे निघालेले विस्तारा विमान पक्षीला धडकल्याने वाराणसी विमानतळावर उतरावे लागले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या