22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयदेश सोडून पळालो नाही; सायरस पुनावाला यांचे स्पष्टीकरण

देश सोडून पळालो नाही; सायरस पुनावाला यांचे स्पष्टीकरण

एकमत ऑनलाईन

पुणे : सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला लंडनमध्ये आहेत. त्यानंतर आता त्यांचे वडील सायरस पुनावाला हे देखील लंडनमध्ये गेल्याने अफवांना ऊत आला आहे. देश सोडून गेल्याच्या वावड्या उठू लागल्या आहेत. त्यावर सायरस पुनावाला यांनी स्पष्टीकरण देत अफवांचे खंडन केले आहे. कुठेही पळून गेलो नसल्याचे त्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

आम्ही दरवर्षी उन्हाळ्यात कुटुंबीयांसोबत लंडनमध्ये जातो. माझा मुलगा पळून गेल्याचा अफवा उडाल्या आहेत. त्या सर्व बातम्या खोट्या आहेत. मे महिन्यात लंडनमध्ये येणे ही काय आमच्यासाठी नविन बाब नाही. आम्ही दरवर्षी लंडनमध्ये येतो, असे सायरस पुनावाला यांनी मुलाखती दरम्यान सांगितले. आमची कंपनी यूरोपमध्ये लसींंसाठी नवे यूनिट उभे करण्याच्या तयारीत आहे. यासाठी आमची इथल्या सरकारसोबत बोलणी सुरु आहेत.

असे असले तरी भारतातील लस उत्पादन सुरु राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष अदर पुनावाला लंडनमध्ये गेल्याने अफवांचे पीक आले होते. त्यानंतर त्यांनी धमकीचे फोन येत असल्याचे एका मुलाखतीत सांगितले होते. त्यानंतर राजकारणाला उत आला होता.

ग्रामीण भागात घरोघरी कोरोना टेस्ट कराव्यात; लसीकरणाचा वेगही वाढवा : मोदी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या