नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात तबलिगी जमात मरकजच्या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना न्यायालयाने २६ जानेवारीला शेतक-यांच्या ट्रॅक्टर रॅलीचा मुद्दा चर्चेत घेतला. यावेळी सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांनी दिल्ली हिंसाचारावर नाराजी व्यक्त करत म्हणाले की, सरकार या मुद्द्यावर डोळे बंद करून का बसली आहे? सरकार का काही करत नाही?, अशी नाराजी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे.
प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनाला हिंसाचाराचे वळण मिळाले. त्यात अनेक शेतक-यांकडून सार्वजनिक ठिकाणाची मोडतोड झाली. त्यामध्ये राष्ट्रीय संपत्तीचे नुकसानही झाले होते. गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात तबलिगी जमातच्या माध्यमांच्या अहवालांविरुद्ध खिलाफ जमीयत उलेमा ए हिंद आणि पीस पार्टीसोबत आणखी काही लोकांनी याचिका दाखल केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालया सुनावणी सुरू होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने २६ जानेवारीला घडलेल्या दिल्ली हिंसाचारावर नाराजी व्यक्त केली.
सरन्यायाधीश एस. ए. बोबडे म्हणाले की, काही समस्यांवर उपाय शोधने जितके महत्वाचे आहे तितकेच काही बातम्यांवर नियंत्रण ठेवणे आणि कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर नियंत्रण ठेवणे महत्वाचे आहे. मला माहीत नाही की तुम्ही का सर्व घटनांवर डोळे मिटून बसला आहात, अशी प्रतिक्रिया सरन्यायाधिशांनी दिली आहे.