निर्मल : तरूणांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण सध्या खूप वाढले असून २० ते ४० वयोगटातील अनेक तरूणांचे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये एक १९ वर्षाचा तरूण लग्नामध्ये डान्स करता करता हृदयविकाराच्या झटक्याने खाली कोसळल्याचे दिसत आहे.
यामध्येच त्याचा मृत्यू झाला आहे. व्हायरल होत असलेला व्हीडीओ हा तेलंगणा येथील असल्याची माहिती आहे. तेलंगणा येथील निर्मल जिल्ह्यातील ही घटना असून लग्नासाठी महाराष्ट्रातून तेलंगणा येथे हा तरूण गेला होता. लग्न समारंभात हा तरूण रात्रीच्या वेळी गाण्यावर डान्स करता करता खाली कोसळला. कोसळल्यानंतर या तरूणाचा काही क्षणात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.