29.2 C
Latur
Sunday, February 28, 2021
Home राष्ट्रीय उद्यापासून होणार डिजिटल मतदान ओळखपत्र जारी

उद्यापासून होणार डिजिटल मतदान ओळखपत्र जारी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राष्ट्रीय मतदार दिवस म्हणजेच २५ जानेवारी़ या दिवशी देशातील नागरिकांना इतर डिजिटल कार्डप्रमाणे मतदान कार्डही आता डिजिटल स्वरुपात उपलब्ध होणार असल्याची माहिती रविवारी निवडणूक आयोगाच्या वतीने देण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मतदार दिनादिवशी डिजिटल मतदान ओळखपत्र जारी करणार आहे. २५ जानेवारीला अधिकृतपणे डिजिटल वोटर कार्ड जारी केले जाणार आहे. मतदार त्यांनंतर निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरुन मतदारकार्ड पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करु शकतात. आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स अगोदरच आपल्याला डिजीटल स्वरुपात उपलब्ध झाली आहेत.

सर्व मतदारांना डिजीटल कार्ड पीडीएफ स्वरुपात मिळेल. नव्या मतदारांना दोन्ही स्वरुपातील मतदान कार्ड मिळणार आहे. डिजीटल मतदान ओळखपत्रावर मतदाराच्या माहितीसह क्यूआर कोड देखील देण्यात येणार आहे. डिजीटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. वेबसाईटवर तुम्हाला मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीद्वारे अकाऊंट तयार करावे लागेल. त्यानंतर तुम्ही डिजीटल मतदार ओळखपत्र डाऊनलोड करता येईल.

पाच राज्यांच्या निवडणुकीपूर्वी लाँचिंग
देशातील ५ राज्यांमध्ये येत्या काही महिन्यामध्ये निवडणूक लागणार आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पाँडिचेरीमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. मात्र, प्रत्येक नागरिकाला मिळू शकेल का हे पाहावे लागणार आहे.

पहिल्या टप्प्यात नव्या मतदारांना वाटप
पहिल्या टप्प्यात २५ ते ३१ जानेवारी दरम्यान नव्या मतदारांना डिजीटल वोटर कार्ड मिळणार आहे. या कालावधीमध्ये जे नवे मतदार नोंदणी करतील त्यांना डिजीटल वोटर कार्ड मिळेल.

मोबाईल नंबर रजिस्टर असणारांना १ फेब्रुवारीपासून कार्ड
ज्या मतदारांचा मोबाईल नंबर निवडणूक आयोगाकडे नोंदवलेला असेल त्यांना १ फेब्रुवारीपासून डिजीटल वोटरकार्ड मिळणार आहे. ज्यांचा क्रमांक निवडणूक आयोगाकडे नाही त्यांना तो निवडणूक आयोगाकडून पडताळणी करुन घ्यावा लागणार आहे.

पुतिनविरोधात नागरिक रस्त्यावर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या