24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयनेपाळ सीमेवरून चिनी नागरिकांची थेट भारतात घुसखोरी

नेपाळ सीमेवरून चिनी नागरिकांची थेट भारतात घुसखोरी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : नेपाळ सीमेवरून बेकायदेशीररित्या भारतात घुसलेले दोन चिनी नागरिक १५ दिवस नोएडात थांबले होते. परंतु, याची कल्पना देखील कोणत्याही पोलिस दलाला आली नाही. शनिवारी या दोघांना नेपाळ सीमेवरून परतत असताना एसएसबीच्या पथकाने पकडले. त्यानंतर दोघांना चौकशीसाठी बिहार पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याप्रकरणी नोएडा पोलिसांनी तपास सुरू केला असून चिनी नागरिक नोएडात कसे आले, त्यांना कोणी आणले याचा शोध पोलिस घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दोन चिनी नागरिक प्रथम चीनमधून थायलंडला पोहोचले. त्यानंतर नेपाळमधील काठमांडूमध्ये दाखल झाले, तेथून सायकलवरून नेपाळच्या सीमेवर आले आणि २४ मे रोजी हे दोन्ही चिनी नागरिक बेकायदेशीरपणे भारतात घुसले. भारतात प्रवेश केल्यानंतर त्यांनी भाड्यानं कार घेतली आणि तेथून नोएडामध्ये राहणा-या कॅरी नावाच्या मैत्रिणीकडे थांबले.

यानंतर दोघंही नोएडा आणि आसपासच्या ठिकाणी १५ दिवस फिरत होते. शनिवारी दोन्ही चिनी नागरिक भाड्याच्या कारमधून पुन्हा नेपाळ सीमेवर पोहोचले आणि कार परतल्यानंतर पायी सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना एसएसबीच्या पथकाने दोघांना पकडले. या दोघांकडून कोणताही भारतीय व्हिसा मिळालेला नाही. याशिवाय भारतात घेतलेले अनेक सिमकार्डही जप्त करण्यात आले आहेत. ३० वर्षीय लू लांग आणि ३२ वर्षीय यूआन हेलांग अशी अटक करण्यात आलेल्या नागरिकांची नावे आहेत. एसएसबीच्या पथकाने अटक केलेल्या दोन्ही तरुणांना बिहारमधील सीतामढीच्या सुरसंद पोलिस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या