26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयपैसे नसल्यानं गैरसोय : रात्रभर तिथेच थांबून राहिले आणि सकाळी....

पैसे नसल्यानं गैरसोय : रात्रभर तिथेच थांबून राहिले आणि सकाळी….

एकमत ऑनलाईन

बाडमेर : देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. काही रुग्ण अजूनही उपचारापासून वंचित राहात असल्याचं पाहायला मिळालं आहे. मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. रुग्णालयाबाहेर उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पावती न फाडल्यानं रुग्णालयानं उपचार करण्यासाठी नकार दिल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. रात्रभर रुग्ण उपचारासाठी रुग्णालयाबाहेर बसून होता मात्र त्यावर कोणतेही उपचार करण्यात आले नाहीत. सकाळी या रुग्णाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

पावती फाडण्यासाठी रुग्णालय प्रशासन अडून दाखवत असल्यानं हा सगळा प्रकार घडल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकाने केला आहे. सुनील धाकड यांनी टीबीचा आजार होता. उपचारासाठी पुरेसे पैसे नसल्यानं पावती तयार करता आली नाही. त्यामुळे रात्रभर रुग्णालयाबाहेर बसून होते. पत्नी आणि सुनील यांनी उपचारासाठी मदत मागितली मात्र पावती तयार केल्याशिवाय रुग्णालयात उपचार मिळत नसल्यानं रात्रभर तिथेच थांबून राहिले. सकाळी सुनील यांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली.रुग्णालयात भरती करण्यासाठी प्रशासनानं आधी पैसे भरण्यास सांगितले मात्र पैसे नसल्यानं मोठी गैरसोय झाली. त्यामुळे पतीला रुग्णालयात उपचार देखील मिळू शकले नाहीत. रुग्णालय प्रशासनाच्या निष्ठूरपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. उपचार न मिळाल्यानं रुग्णालयाबाहेर सुनील यांचा मृत्यू झाल्यानं मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयावर रोष व्यक्त केला आहे.

read More  तांत्रिकांच्या सांगण्यावरून वडिलांनी 5 मुलांची केली हत्या

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या