22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयराजपथचे नाव बदलण्यावरून काँग्रेसमध्येच मतभेद!

राजपथचे नाव बदलण्यावरून काँग्रेसमध्येच मतभेद!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : राजपथ आणि विस्टा लॉन यांचे नाव बदलून कर्तव्य पथ केल्या जाण्याच्या बातम्यानंतर राजकारण चालू झाले आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. यावर तृणमूल काँग्रेसचे खासदार महूआ मोइत्रा यांचे एक ट्विट समोर आले आहे. ते त्यात म्हणाले हे काय चालले आहे. भाजपने आमची संस्कृती बदलण्याचा पण बांधला आहे काय?

सरकारच्या या निर्णया बद्दल काँग्रेसने पण केंद्र सरकारवर जोरदार टिका केली आहे. काँग्रेसचे सोशल मीडिया प्रमुख पवन खेडा यांनी सरकारवर टिका केली आहे. ते म्हणाले राजपथाचे नाव बदलून राजधर्म पथ केले पाहिजे होते. यामुळे अटल बिहारी वाजपेयी यांच्या आत्म्याला शांती मिळाली असते. तर काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी सरकारच्या या निर्णयांचे समर्थन केले आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या मंदिराकडे जाणा-या रस्त्याचे कर्तव्य पथ हे योग्य नाव असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, नवी दिल्ली महानगरपालिकेची ७ सप्टेंबरला एक विशेष बैठक बोलवली आहे. यावेळी नामांतराचा प्रस्ताव समिती समोर ठेवला जाणार आहे. महानगरपालिकेकडून सांगितले की ही बैठक राजपथ आणि सेंट्रल विस्टा लॉन नामांतरासाठी बोलवली आहे. इंडिया गेट येथील नेताजींच्या पुतळ्यापासून, राष्ट्रपती भवनापर्यंतचा संपूर्ण रस्ता आणि परिसर कार्तव्यपथ म्हणून ओळखला जाईल. ब्रिटिश राजवटीत राजपथ किंग्सवे म्हणून ओळखला जात होता. ८ सप्टेंबरला संध्याकाळी पंतप्रधान मोदी या संपूर्ण परिसराचे उद्घाटन करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट काय आहे
सेंट्रल विस्टा प्रकल्पाची घोषणा २०१९ मध्ये केली होती, १० डिसेंबर २०२० ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी या प्रकल्पाची सुरूवात झाली आणि आता त्याचे काम पुर्ण झाले आहे.

नवीन त्रिकोणी संसद भवन
– एक सामान्य केंद्रीय सचिवालय
– नवीन पंतप्रधानांचे निवासस्थान
– नवीन पंतप्रधान कार्यालय
– एक नवीन उपराष्ट्रपती एन्क्लेव्ह

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या