नवी दिल्ली : दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने सोमवार दि़ २६ ऑक्टोबर रोजी एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत ही याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे़ सोबतच, सर्वोच्च न्यायालयानं याचिकाकर्त्यांना उच्च न्यायालयात जाण्याचाही सल्ला दिला आहे. त्यानंतर याचिकाकर्त्यांकडून याचिका मागे घेण्यात आली.
याचिकाकर्त्यांच्या दाव्यानुसार, सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालिया मृत्यू प्रकरण एकमेकांशी संबंधित आहे. कारण दोघांचाही मृत्यू संशयास्पद अवस्थेत झाला आहे, असे याचिकाकर्त्यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते़ मुंबईच्या उच्चपदस्थ पोलिस अधिकाºयांना या प्रकरणातील तपासाचा सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी मागणीही या याचिकेद्वारे करण्यात आली होती. मुंबई पोलिसांचा अहवाल सदोष आढळला तर हे प्रकरण सीबीआयला हस्तांतरीत केले जावे, अशीही मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली होती.
मागच्या सुनावणीतच खंडपीठाने याचिकाकर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार करण्याचा सल्ला याचिकाकर्त्यांना दिला होता. गेल्या दोन सुनावणीत या याचिकेसंदर्भात कुणीही न्यायालयासमोर हजर झाले नव्हते, असेही न्यायालयाने नोंदवले होते़ या टिप्पणीसोबतच खंडपीठाने पुनीत कौर ढांडा यांच्याकडून दाखल करण्यात आलेली जनहित याचिका एका आठवड्यासाठी स्थगित केली होती.
बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिला टप्प्यातील प्रचार आज थंडावणार