27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयकर्नाटकात टीपू सुलतानकालीन मशिदीचा वाद उफाळला

कर्नाटकात टीपू सुलतानकालीन मशिदीचा वाद उफाळला

एकमत ऑनलाईन

मांड्या : बनारसमधील ज्ञानवापी मशीद प्रकरणावरून संपूर्ण देशातील राजकीय वातावरण तापले आहे. हा वाद ताजा असताना आता कर्नाटकातील मांड्या येथे बांधलेल्या जामा मशिदीवरून नवीन वादाला सुरुवात झाली आहे. टिपू सुलतानने हनुमानाचे मंदिर पाडून त्याठिकाणी ही मशीद बांधल्याचा दावा एका हिंदुत्ववादी गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ही मशीद पुन्हा हिंदूंच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी गटाकडून करण्यात आली आहे.

याबाबत नरेंद्र मोदी विचार मंचच्या सदस्यांनी मांड्यांच्या जिल्हाधिका-­यांना एक निवेदन दिले आहे. हनुमान मंदिर पाडून बांधलेली मशीद हिंदूंच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी या मंचाकडून करण्यात आली आहे. जामा मशीद म्हणून ओळखली जाणारी ही मशीद २३६ वर्षे जुनी असल्याचे सांगितले जात आहे. श्रीरंगपट्टन येथे बांधलेली ही मशीद आता नव्या वादाचे कारण बनू शकते. नरेंद्र मोदी विचार मंचाचे सचिव सीटी मंजूनाथ म्हणाले की, पर्शियाच्या शासकाला लिहिलेल्या पत्रात टिपूने हनुमान मंदिर पाडून ही मशीद बांधल्याचा उल्लेख केला आहे.

तसेच मशिदीच्या स्तंभांवर हिंदू श्लोक देखील लिहिले आहेत, असा दावा मंजूनाथ यांनी केला आहे.
त्यांनी पुढे आपल्या दाव्यात म्हटले की, १७८२ मध्ये हनुमान मंदिर पाडल्यानंतर टिपू सुलतानने ही मशीद बांधली होती. ही मशीद एकेकाळी हिंदूंचे मंदिर होते, हे सिद्ध करणारे भक्कम पुरावे आहेत. मशिदीच्या आतमध्ये तत्कालीन होयसला साम्राज्याची चिन्हे आहेत. त्यामुळे संबंधित मशिदीत हिंदूंना पूजा करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी मंजूनाथ यांनी केली. तर मुघल राजवटीच्या काळात येथील ३ हजार ६०० मंदिरे पाडण्यात आली, असा दावा कर्नाटकचे माजी मंत्री के .इश्वरप्पा यांनी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या