नवी दिल्ली: तृणमूल काँग्रेसने नव्या संसद भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला विरोध दर्शवला आहे. हा कार्यक्रम धर्मनिरपेक्षतेविरुद्ध असल्याचे पक्षाने म्हटले आहे. इतर अनेक नेत्यांनीही सरकारच्या प्राथमिकतेवर प्रश्नचिन्ह लावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १० डिसेंबर रोजी नव्या संसद भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन करणार आहेत.
काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी पुजेच्या निर्णयावर टीका केली. अल्वी म्हणाले की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदी भूमिपूजन करणार असतील तर त्यांनी इतर धर्मातील नेत्यांना देखील आमंत्रित करावे. देशातील प्रत्येक नागरिकाला संसद भवन आपले वाटले पाहिजे हा यामागील उद्देश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मजिद मेमन यांनीही भूमिपूजनापूर्वी सर्व धर्मीय प्रार्थनासभेचे आयोजन केले गेले पाहिजे,असे म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाची भूमिपूजनाला सशर्त मंजुरी
सर्वोच्च न्यायालयाने सरकारच्या सेंट्रल विस्टा परियोजनेला विरोध दर्शवणा-या प्रलंबित याचिकांवर कोणताही निर्णय येईपर्यंत निर्माण कार्य किंवा इमारत पाडण्याचे कोणतेही काम न करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर केंद्राला कोनशिला बसवण्याचा कार्यक्रम आयोजित करण्याचा मंजुरी दिली.
आंदोलकांकरिता मुस्लिम तरुणांनी सुरू केली लंगर सेवा