24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयस्वातंत्र्यदिनी सरकारी शाळेत अफूचे वाटप

स्वातंत्र्यदिनी सरकारी शाळेत अफूचे वाटप

एकमत ऑनलाईन

जयपूर : राजस्थानमधील एका सरकारी शाळेत स्वातंत्र्यदिनी अफूचे वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबतचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला असून याप्रकरणी शिक्षणाधिका-यांनी चौकशीचे आश्वासन दिले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा धक्कादायक प्रकार राजस्थामधील बाडमेर जिल्ह्यातील गुडामलानी उपविभागातील रावली नाडी येथील शाळेतील आहे. व्हायरल झालेल्या व्हीडीओमध्ये शाळेचा परिसर स्पष्टपणे दिसून येत आहे. सोमवारी शाळेत ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी शाळेत सतरंजी टाकून बसले. त्यानंतर या सर्वांना अफू देण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या