22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयदिल्लीत फटाक्याविना दिवाळी

दिल्लीत फटाक्याविना दिवाळी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील सर्वात प्रदुषित राज्य दिल्ली आहे. यामुळे आप सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, यावेळी दिल्लीत दिवाळी फटाकेमुक्त होणार आहे. दिल्ली सरकारने फटाक्यांच्या विक्रीवर आणि वापरावर बंदी घातली आहे. ही बंदी १ जानेवारी २०२३ पर्यंत असणार आहे. दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. यावेळी ऑनलाइन विक्री आणि वितरणावरही बंदी घालण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दिल्ली सरकारचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी फटाक्यांवर बंदी घातली आहे, त्यानी हा निर्णय वाढत्या प्रदूशनाला रोखण्यासाठी घेतला आणि लोकांच्या आरोग्यासाठी घेतल्याचे सांगितले. या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असून त्यासाठी दिल्ली पोलिसांचे सहकार्य घेण्यात येणार असल्याचे गोपाल राय यांनी सांगितले. यावर्षी ऑफलाइन आणि ऑनलाइन फटाक्यांच्या विक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.

सर्व प्रकारांवर बंदी
गोपाल राय यांनी ट्विट केले की, दिल्लीतील जनतेला प्रदूषणाच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी गेल्या वर्षीप्रमाणेच याही वेळी फटाक्यांच्या उत्पादनावर, विक्रीवर आणि सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या वापरावर पूर्ण पणे बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यासाठी दिल्ली पोलिस, डीपीसीसी आणि महसूल विभागासोबत चर्चा करून आराखडा तयार केला जाईल.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या