नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रद्धा वालकर मर्डर केसमध्ये ऊठअ चा रिपोर्ट समोर आला आहे. यामध्ये रिपोर्टमधून महत्वाचा खुलासा झाला आहे. दिल्ली पोलिसांकडे हा रिपोर्ट आला असून या प्रकरणात त्यामुळे मोठी मदत होणार आहे.
दिल्ली पोलिसांचे विशेष पोलिस आयुक्त सागर प्रीत हुडा म्हणाले, मायटोकॉन्ड्रीअल डीएनए रिपोर्ट आम्हाला प्राप्त झाला असून यामध्ये केस आणि हाडांच्या नमुन्यांचा डीएनए हा श्रद्धा वालकरशी मिळता आहे. डीएनए फिंगरप्रिंटिंग आणि डाग्नोस्टिक्स विभागाकडून हा रिपोर्ट प्राप्त झाला आहे.