28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयकोरोना नियंत्रणासाठी आवश्यक सर्व करा

कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक सर्व करा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी होत असले तरी अद्यापही दररोज आढळून येणा-या नव्या बाधितांची संख्या जास्तच आहे. महामारीचे नियंत्रण अधिक गतीने होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशातील महत्त्वाच्या ४६ जिल्ह्यांमधील जिल्हाधिका-यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. यावेळी पंतप्रधानांनी सर्व जिल्हाधिका-यांना तुमच्या जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यासाठी जे काही करता येईल ते करा,तुम्हाला माझ्याकडून पुर्ण मुभा असल्याचे सांगत त्यांना पुर्ण पाठिंबा दर्शविला.

पंतप्रधानांनी मंगळवारी कर्नाटक, बिहार, आसाम, चंदिगड, तामिळनाडू, उत्तराखंड, मध्य प्रदेश, गोवा, हिमाचल प्रदेश आणि दिल्लीमधील जिल्हाधिका-यांशी चर्चा केली. मोदींनी जिल्हाधिका-यांना टेस्टिंग, कंटेन्मेंट आणि लसीकरणाबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. तसेच प्रशासकीय अधिकारी म्हणजे कोरोनाविरोधातील लढाईमधील कमांडर असल्याचे सांगितले. तुम्ही तुमच्या जिल्ह्याला कोरोनामुक्त केलेत, तर देशही कोरोनामुक्त व्हायला वेळ लागणार नाही. तुमच्या जिल्ह्यातील कोरोनाला रोखण्यासाठी जे करता येईल ते करा. देशात जेवढे जिल्हे आहेत. तेवढीच वेगवेगळी आव्हाने आहेत. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील आव्हाने चांगल्या पद्धतीने माहिती आहेत, त्यामुळे तुम्हाला कोरोना नियंत्रणासाठी योजावयाच्या उपाययोजनांबाबत पुर्ण मुभा आहे, असे मोदींनी सांगितले.

ग्रामीण भागावर अधिक लक्ष द्या
कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये ग्रामीण आणि दुर्गम भागातही कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यापार्श्वभुमीवर या भागांवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कोविडशिवाय तुमच्या जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाच्या ईज ऑफ लिव्हिंगवरही लक्ष ठेवा, अशा सुचनाही पंतप्रधानांनी यावेळी दिल्या.

तीन टी वर भर देण्याची सूचना
बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोनाविरोधात लढण्याची हत्यारे आणि टेस्ंिटग, ट्रॅकिंग फॉर्म्युल्याचा विशेष उल्लेख केला.कोरोना विषाणूविरोधात लढण्यासाठी आपल्याकडे लोकल कंटेन्मेंट झोन, वेगाने तपासणी आणि लोकांपर्यंत योग्य आणि संपूर्ण माहिती पोहोचवणे. टेस्ंिटग ट्रॅकिंग, ट्रिटमेंट आणि कोरोनाकाळातील नियमांचे पालन करणे ही हत्यारे आहेत. त्यांचा अधिक सक्षमपणे वापर करा, असेही मोदींनी सांगितले.

इस्त्रायलचा विरोधकांना इशारा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या