22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeराष्ट्रीयकोणत्याही रुग्णास नाकारू नका; आरोग्य मंत्रालयाचा रुग्णालयांना आदेश

कोणत्याही रुग्णास नाकारू नका; आरोग्य मंत्रालयाचा रुग्णालयांना आदेश

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रुग्णांवर वेळीच उपचार होत नसल्याने वाढत असलेला मृत्यूचा आकडा आणि विविध नियमांवर बोट ठेवत दाखल करून घेण्यास रुग्णालयांकडून दिला जाणार नकार, यापार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कठोर पावले उचलली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना दाखल करुन घेण्यासंदर्भातील राष्ट्रीय धोरणात मोठे बदल केले आहेत. कोरोना बाधितांना दिलासा देतानाच रुग्णालयांच्या मनमानीला चाप लावण्याचा प्रयत्न केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केला आहे.

रुग्णांला दाखल करुन घेण्यासाठी पॉझिटिव्ह टेस्ट सक्तीची असणार नाही. त्याचबरोबर रुग्ण कोणत्याही शहरातील असला, तरी कोरोना संशयित रुग्णाला कोविड केअर सेंटर, पूर्णपणे कोविड समर्पित सेंटर वा पूर्णपणे कोविड रुग्णालयांनी संशयित रुग्णाच्या विभागात दाखल करुन घ्यावे. एकाही रुग्णाला कोणत्याही परिस्थिती दाखल करून घेण्यास नकार देता येणार नाही. यात आॅक्सिजन वा औषधी या देण्यास सुद्धा नकार देता येणार नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

कोरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल करुन घेण्याबाबत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राष्ट्रीय धोरण तयार केले होते़ यात आरटीपीसीआर चाचणीसह काही नियम घालून देण्यात आले होते. मात्र, मागील काही काळात रुग्णालयांकडून रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार दिला जात असल्याच्या तसेच रुग्णांना ओळखपत्र नसल्याने प्रवेश नाकारला जात असल्याच्या अनेक घटना समोर आल्या. या घटनांची दखल घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना दाखल करून घेण्याबद्दलच्या राष्ट्रीय धोरणात मोठे बदल केले आहेत.

आता तामिळनाडूत अनिवासी तामिळ विभाग

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या