27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयडॉक्टरची हलगर्जी; पोटात ठेवली कात्री

डॉक्टरची हलगर्जी; पोटात ठेवली कात्री

एकमत ऑनलाईन

पंजाब : पंजाबमधील मोगा इथे शासकीय रुग्णालयामध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. धक्कादायक म्हणजे, जेव्हा या महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा एक कात्रीच सापडून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

पंजाबमधील मोगा शहरात ही घटना घडली आहे. मृत महिला ही बुध सिंह वाला या गावात राहत होती. तीन दिवसांपूर्वी तिला मोगाच्या एका सरकारी रुग्णालयात प्रसूती वेदना आल्यामुळे दाखल करण्यात आले होते. शस्त्रक्रिया पार पडली. त्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता.

घरी गेल्यानंतर दोन दिवसांनी त्या महिलेची प्रकृती अचानक ढासळली. त्यानंतर पुन्हा तिला मोगा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, प्रकृती नाजूक असल्यामुळे फरीदकोट येथील रुग्णालयात हलवण्यात आले. पण, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. महिलेचा मृतदेह हा तिच्या कुटुंबीयांकडे स्वाधीन करण्यात आला.

अधिक पावसामुळे थंडीचा जोर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या