26.9 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home राष्ट्रीय कोव्हॅक्सिन लस घेण्यास डॉक्टरांचा नकार

कोव्हॅक्सिन लस घेण्यास डॉक्टरांचा नकार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात शनिवारपासून कोव्हिड १९ लसीकरण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला.मात्र पहिल्याच दिवशी या मोहिमेला डॉक्टरांच्या असहकार्याचा अनुभव आला. दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टर तसेच कर्मचा-यांना लसीकरणासाठी कोव्हॅक्झिन या लसीची खेप पाठवली होती. मात्र डॉक्टरांनी कोव्हॅक्झिन लसीला नापसंती दर्शवली. रुग्णालयाच्या रेसिडेन्ट डॉक्टरांनी मेडिकल सुपरिटेन्डन्टला पत्र लिहून कोव्हिशिल्डचा डोस देण्याची मागणी केली आहे. मात्र अद्याप याबद्दल रुग्णालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया समोर आलेली नाही

लसीकरण मोहिमेत भारत बायोटेककडून विकसित केलेल्या कोव्हॅक्सिन लशीला कोव्हिशिल्डपेक्षा जास्त महत्त्व दिले जात आहे. मात्र रेसिडेन्ट डॉक्टरांच्या मनात कोव्हॅक्सिन लसीची चाचणी पूर्ण न झाल्याने काही शंका आहेत, असे सांगत अशाप्रकारच्या लसीमुळे लसीकरणाचा उद्देश साध्य होणार नाही, असे या डॉक्टरांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

लसीचा पर्यायच उपलब्ध नाही
उल्लेखनीय म्हणजे, कोव्हिशिल्ड की कोव्हॅक्सिन असा पर्याय लस घेणा-या व्यक्तीला उपलब्ध नाही. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) रुग्णालयाचे डॉक्टर, नर्स आणि आरोग्य कर्मचा-यांनीही आजपासून सुरू झालेल्या मोहिमेत सहभागी होत लसीचे डोस घेतले.

तज्ज्ञांकडून सुरक्षित असल्याचा निर्वाळा
कोव्हॅक्सिन लसीच्या चाचणी टप्प्यात एम्समध्ये लसीची चाचणी सुरु असताना स्वयंसेवकांची कमतरता दिसून आली होती. परंतु, आता त्याच कोव्हॅक्सिनचा पुरवठा एम्समध्ये करण्यात आला आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनची चाचणी एम्स रुग्णालयात पार पडली आहे. तसेच तज्ज्ञांकडून ही लस सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. यापूर्वी एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी कोव्हॅक्सिनला बॅकअप म्हटले होते. यावर, भारत बायोटेकच्या सीईओंनी गुलेरिया यांचे वक्तव्य फेटाळून लावतानाच आपला आक्षेपही व्यक्त केला होता.

सोलापूर जिल्ह्यात चुरशीने मतदान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या