26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeराष्ट्रीयलसीमुळे रक्ताच्या गाठी होतायेत?

लसीमुळे रक्ताच्या गाठी होतायेत?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीने रक्तात गाठी होत असल्याच्या तक्रारी काही देशांमध्ये समोर आल्या होत्या. त्यावरून अनेक देशांनी चिंता व्यक्त केली होती. तर ३० वर्षांखालील नागरिकांना अ‍ॅस्ट्राझेनेकाची लस दिली जाऊ नये, अशा सूचना काही देशांनी जारी केल्या आहेत. इतर देशांमधील तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आता भारतातील ७०० जणांवर अभ्यास करण्यात येत आहे.

कोरोनावरील लस घेतल्यानंतर ज्यांना आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या त्यांचा यात समावेश आहे. भारतात आता याचा आढावा घेतला जात आहे. तसेच, रक्तात होणा-या गाठींचा लसीकरणाशी काही संबंध आहे की नाही? याचा समजून घेतले जात आहे. अनेक देशांमध्ये ऑक्स्फोर्ड अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या लसीबाबत तक्रारी आल्या आहेत. लस घेतल्यानंतर रक्ताच्या गुठळ्या होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. भारतातही या लसीचा उपयोग होत आहे़ भारतात ही लस कोविशिल्ड नावाने ओळखली जात आहे़ सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या लसीचे उत्पादन करत आहेत.

भारतात तक्रार नाही मात्र तपास सुरू
पोस्ट इम्यूनायजेशन अ‍ॅडवर्स रिअ‍ॅक्शन या यंत्रणेद्वारे भारतात कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लस दिल्यानंतर होणा-या साइड इफेक्ट संबंधीच्या आकड्यांची तपासणी करत आहेत. यामुळे रक्तात होणा-या गुठळ्याचा काय संबंध आहे? हे यातून तपासले जात आहे. भारतात अद्याप अशा प्रकारची कुठलीही तक्रार समोर आलेली नाही. भारतात या प्रकरणी सुरू असलेल्या तपासाच्या अहवालाला या आठवड्यात अंतिम स्वरुप दिले जाईल. भारताचा डाटावर इतर देशांचेही लक्ष आहे.

गाठी होणे दुर्मिळ स्थिती
लस घेतल्यानंतर रक्तात गुठळ्या होणे ही दुर्मिळ स्थिती आहे. काही नागरिकांच्या शरिरात प्लेटलेट्स तयार न होणे हे एक मोठे कारण आहे. जगभरात कोट्यवधी नागरिकांनी लस घेतली आहे़ पण त्यापैकी मोजक्याच नागरिकांमध्ये ही तक्रार आली आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.

कोरोना आणि वैश्विक आव्हाने

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या