27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयकुत्र्याचा वाढदिवस, १०० किलोचा केक, ५ हजार पाहूणे

कुत्र्याचा वाढदिवस, १०० किलोचा केक, ५ हजार पाहूणे

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : कुत्रा आणि माणूस यांच्यातील मैत्रीची, प्रेमाची अनेक उदाहरणे आतापर्यंत आपण पाहिली आहेत. काही ठिकाणी तर असंही झालं की, आपल्या जीवाची पर्वा न करता अनेकवेळा कुत्र्यांनी माणसांचा जीव वाचवला आहे. तर, काही ठिकाणी माणसांनी कुत्र्यांचा जीव वाचवला आहे. माणसांची ही कुत्र्यांसोबतची मैत्री आणि कुत्र्याची माणसांप्रती निष्ठा वेगवेगळ्या प्रकारे साजरी करताना दिसतेय.

असंच एक उदाहरण आता कर्नाटकात पाहायला मिळालं आहे. कर्नाटकात क्रिश नावाच्या कुत्र्याचा वाढदिवस अत्यंत थाटामाटात साजरा झाला. कर्नाटकातील शिवप्पा येलप्पा माराडी यांनी आपल्या पाळीव कुत्र्याचा, क्रिशचा वाढदिवस इतक्या भव्य पद्धतीने साजरा केला की आजूबाजूचे लोक नुसते पाहतच राहिले. बेळगावच्या शिवप्पा यांनी क्रिशच्या वाढदिवसानिमित्त १०० किलो वजनाचा केक कापला आणि सुमारे ५००० पै-पाहुणे जेवू घातले. या जेवणात शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारचे जेवण होते असे सांगण्यात आले आहे.

अशा या अनोख्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हीडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये दिसते की, क्रिशने जांभळ्या रंगाची टोपी घातलेली आहे आणि शिवप्पा यांनी स्वतः हा १०० किलोचा केक कापून आपल्या प्रिय क्रिशला खाऊ घातला आहे. आजूबाजूला उभे असलेली पाहुणेमंडळी क्रिशसाठी टाळ्या वाजवताना दिसतात. अशारितीने हा वाढदिवसाचा सोहळा पार पडला.

या आधी काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये दोन कुत्र्यांच्या लग्नाच्या बातम्या आल्या होत्या. लग्नाला ४०० हून अधिक पाहुणे उपस्थित होते आणि लग्न पूर्ण रितीरिवाजाने पार पडले. तसेच एप्रिल २०२२ मध्ये तामिळनाडूतील एका कुटुंबाने आपल्या कुत्र्यांचे बेबी शॉवर सुद्धा केले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या