26.7 C
Latur
Friday, December 3, 2021
Homeराष्ट्रीयसंध्याकाळी ५ नंतर पोलिस स्थानकातही जाऊ नका

संध्याकाळी ५ नंतर पोलिस स्थानकातही जाऊ नका

एकमत ऑनलाईन

वाराणसी : पोलिस स्थानकामध्ये एक महिला अधिकारी आणि उप निरिक्षक नक्कीच असतात. मात्र एक गोष्ट मी नक्की सांगू इच्छिते की संध्याकाळी ५ वाजल्यानंतर अंधार झाल्यावर पोलिस स्थानकात कधीच जाऊ नका. अगदीच गरज असेल तर दुस-या दिवशी सकाळी तुमच्या भावासोबत किंवा पतीसोबत किंवा वडिलांसोबत पोलिस स्थानकात जा, असे बेबी राणी मौर्य यांनी म्हटल्याने उत्तर प्रदेशातील योगी सरकारला कायदा आणि सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर घरचाच आहेर मिळाला आहे.

भाजपाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा बेबी राणी मौर्य यांनी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणा-या त्यांच्याच पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारमधील कायदा सुव्यवस्थेसंदर्भात चिंता व्यक्त केली. महिलांसंदर्भात भाष्य करताना बेबी राणी मौर्य यांनी पोलिस स्थानकांमधील सुरक्षेबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. वाराणसीमध्ये आयोजित वाल्मिकी महोत्सवच्या कार्यक्रमादरम्यान महिलांना संबोधित करताना बेबी राणी मौर्य यांनी हे वक्तव्य केले.
अधिकारी सर्वांनाच गोंधळात टाकतात.

मला परवा आग्रा येथून एका शेतक-याचा फोन आलेला. त्याला खते उपलब्ध करुन दिले जात नव्हते. माझ्या सांगण्यावर अधिका-याने शेतक-याला खत देऊ असे सांगितले. मात्र आज त्या अधिका-याने पुन्हा खत देण्यास नकार दिला. अशाप्रकारचा गोंधळ खालच्या स्तरावरील अधिकारी करतात. या गोष्टी तुमच्या लक्षात येणे गरजेचे आहे. कोणताही अधिकारी असे वागत असेल तर त्याची तक्रार जिल्हाधिका-याकडे करा. पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार करा, असे मौर्य म्हणाल्या.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या