20.9 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeराष्ट्रीयसणासुदीत कोरोनाचा विसर पडू देऊ नका

सणासुदीत कोरोनाचा विसर पडू देऊ नका

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून देशतील जनतेसोबत संवाद सांधला. यावेळी त्यांनी नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. कोरोनाचे संकट अद्याप गेलेले नाही. त्यामुळे सणासुदीच्या काळात नियमाचे पालन करा. सण-उत्सव साजरे करताना कोरोना आणखी गेला नाही हे लक्षात ठेवा, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या रेडिओ कार्यक्रमाच्या ७९ व्या भागात विविध विषयांवर भाष्य केले. यामध्ये कोरोना नियम, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा, कारगिल युद्ध दिवस, अमृत महोत्सव आणि स्वातंत्र्य दिन या सर्व मुद्यावर देशातील जनतेसोबत संवाद साधला. टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणा-या खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचे आवाहनही मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमात केले. पंतप्रधानांनी आपल्या ७८ व्या भागातही ऑलिम्पिक स्पर्धेतील खेळाडूचे कौतुक केले होते. कोरोना महामारीच्या काळात पंतप्रधान मोदी सतत जनतेशी संवाद साधत आहेत. आजही देशवासियांना त्यांनी संबोधित केले. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी हा कार्यक्रम आकाशवाणीवरुन प्रसारित होत असतो. मन की बात या २० मिनिटांच्या कार्यक्रमातून सरकारच्या महत्वाच्या कामांची माहिती दिली जाते.

विविध घटनेचा घेतला आढावा
देशाच्या कानाकोप-यातील दखलपात्र छोट्या-मोठ्या घटनांचा आढावा यात घेतला जातो. जनतेकडून विषय विचारले जातात, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या जातात. मन की बातच्या पहिल्या एपिसोडमध्ये (ऑक्टोबर २०१४) मोदींनी स्वच्छतेवर भाष्य केले होते़ तर नोव्हेंबर २०१८ मध्ये राज्यघटनेवर चर्चा केली होती. आजपर्यंत या कार्यक्रमासाठी ६१,००० कल्पना जनतेने दिल्या आहेत. देशातील सर्व प्रकारची प्रसारमाध्यमे या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण करत असतात.

१५ टक्के शुल्ककपात; सुप्रीम कोर्टाचा राज्यातील पालकांना दिलासा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या